Sangli Samachar

The Janshakti News

मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा..' पुण्यात रामदास आठवलेंची कविता



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २ मे २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत बोलताना शरद पवारांना भटकती आत्मा म्हणत टीका केली होती. शरद पवार यांच्यासह विरोधकांनीही या टीकेला जोरदार उत्तर दिलं. हाच धागा पकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर थेट कविता रचली. 

शरद पवार यांना मी दिल्लीत रोज भेटतो. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी आमची मैत्री असल्याचे वक्तव्य आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं. आता अजित पवार आमच्यासोबत आले असल्याचे आठवले म्हणाले.

आठवलेंची कविता
नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा.. कारण आम्हाला महाविकास आघाडीचा करायचा आहे खात्मा, अशा शैलीत रामदास आठवले यांनी कविता केली आहे. मोदींचा आत्मा देशभर भटकत आहे. लोकशाही धोक्यात आली असते तर मत मागायला आले असते का? या देशामध्ये ज्याला संविधान मान्य त्यांनाच राहायचा अधिकार आहे. बाकी सगळ्याना चले जावचा नारा द्यावा लागेल. मोदींचा 400 पारचा नारा बरोबर आहे. मोदींच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यात महायुतीला 40 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा आठवले यांनी केला.


संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी फक्त आरोप करण्यासाठी ठेवले आहे. ज्या वेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. त्यावेळेस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होते. पुण्याच्या चारही आणि मुंबईच्या सहा जागा निवडून येतील. संविधानाला अजिबात धोक्यात नाही, मुस्लिम समाजासोबत आम्ही आहोत. जागा मिळाली नाही तरी मी महायुतीसोबत आहे. माझा पाठींबा बिनशर्त नाही, राज्यात एक मंत्रिपद, महामंडळ, विधानसभेच्या जागा देण्याचे मान्य केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे आम्हाला फरक पडणार नाही. महाविकास आघाडीला फरक पडेल. महादेव जानकर शरद पवार यांना जाऊन भेटले म्हणून त्यांना महायुतीकडून जागा मिळाली. संविधान बदलने ही भाजपची भूमिका नाही. पवार साहेबांचे आणि माझे चांगले संबंध आणि संबंध वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. मोदी भटकते आत्मा असे शरद पवार यांना उद्देशाने बोलले नसतील. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना होयला नको होता. सुप्रिया सुळे यांनी वेगळा विचार करायला हवा होता, असा सल्लाही यावेळी आठवले यांनी दिला.