Sangli Samachar

The Janshakti News

5 कोटींच्या लुटी प्रकरणी दोघांना अटक, कवठेमहांकाळ पोलिसांची कारवाई| सांगली समाचार वृत्त |
कवठेमंकाळ - दि. २६ मे २०२४
कर्नाटक राज्यामध्ये दोन वर्षांपूर्वी खळबळ उडवून देणाऱ्या पाच कोटी लुटेतील मुख्य आरोपींना अटक करण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. कवठेमहांकाळ पोलिसांनी अजय मलमे आणि योगेश आठवले या दाेन संशयितांना अटक केली आहे. या दोघांनीही कर्नाटक राज्यातल्या बैलहोंगल येथे 2022 मध्ये हवालाच्या माध्यमातून घेऊन जाण्यात येणारे पाच कोटींची रक्कम सिनेस्टाईल पद्धतीने लुट केली होती. याप्रकरणी कर्नाटकात दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यांचा पाेलिसांकडून शाेध सुरु हाेता.


दरम्यान कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये योगेश आठवले याचा शोध घेत असताना त्याचा मित्र असणाऱ्या अजय मलमे याला ताब्यात घेतल्यावर दोघांनी मिळून बैलहोंगल मधले पाच कोटी रुपये लुटल्याचा तपासात समोर आले आहे. यानंतर या दोघांनाही अटक करण्यात आली.यापैकी अजय मलमे याला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.