Sangli Samachar

The Janshakti News

ममता बॅनर्जींच्या विरोधात 500 साधुंची अनवाणी रॅली| सांगली समाचार वृत्त |
कोलकत्ता - दि. २५ मे २०२४
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामकृष्ण मिशन आणि भारत सेवाश्रम संघाच्या काही संतांविरुद्ध केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ साधू-संतांनी आज, शुक्रवारी कोलकाता येथे अनवाणी रॅली काढली. 'संत स्वाभिमान यात्रा' या नावाखाली विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) राज्यातील संतांची सर्वोच्च संस्था असलेल्या बंगिया संन्यासी समाजाच्या सदस्यांसह उत्तर कोलकाता येथील बागबाजार ते 'शिमला स्ट्रीट' अशी रॅली काढली. 


स्वामी विवेकानंदांच्या निवासस्थानी एका साधू सांगितले की, आम्ही मुख्यमंत्र्यांनी साधू-संतांच्या विरोधात केलेल्या टिप्पण्यांचा निषेध करतो. त्यांनी केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांमुळे आम्ही दुःखी आहोत आणि अपमानित आहोत. ममता बॅनर्जी राजधर्म पाळत नाही असे त्यांनी सांगितले. तर विहिंपचे सौरिश मुखर्जी म्हणाले की, व्होट बँकेच्या राजकारणामुळे मुख्यमंत्री रामकृष्ण मिशन आणि भारत सेवाश्रम संघासारख्या प्रतिष्ठित संस्थांविरोधात अशा प्रकारची टिप्पणी करत आहेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जलपायगुडीतील रामकृष्ण मिशन (आरकेएम) कॉम्प्लेक्सची तोडफोड केल्यानंतर बंदुकीच्या बळावर संतांना धमकावले होते. त्यानंतर ममता बॅनर्जींनी बचावात्मक पवित्रा घेत आपण काही निवडक लोकांवरच टीका केल्याचे स्पष्टीकरण दिले होते.