Sangli Samachar

The Janshakti News

मुंबई-पुणे प्रवास होणार अवघ्या 25 मिनिटात !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १० मे २०२४
सध्या देशात तसेच महाराष्ट्रात अनेक विकास कामे वेगाने पूर्ण होत आहेत. त्यातून गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ती म्हणजे मुंबई-पुणे हायरलूप ट्रेनची. या ट्रेनमुळे मुंबई-पुणे हा प्रवास अवघ्या 25 मिनिटात पूर्ण होणार आहे. 

तंत्रज्ञान हे फार मोठ्या प्रमाणात पुढे जाते आहे. लवकरच या नव्या उपक्रमाला सुरूवात होईल. महाराष्ट्र सरकारनं हायरलूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टिमला मान्यता दिली आहे. हा प्रकल्प लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे ट्रान्सपोर्टेशनमध्ये फार मोठा कायापालट होईल, कारण मुंबई-पुणे प्रवास करणारे दिवसभर लाखो प्रवासी आहेत. त्यामुळे हे प्रकल्पही त्याअर्थी महत्त्वाचा ठरेल. तेव्हा या प्रोजेक्टबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. 

सार्वजनिक वाहतुकीसाठी हायपरलूप तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, हायरलूप तयार झाल्यानंतर मुंबई-पुणे हा प्रवास अवघ्या 25 मिनिटांत पूर्ण होईल. सध्या हे अंतर कापण्यासाठी 3.5 ते 4 तास लागतात. विशेष म्हणजे मुंबईहून पुण्याला विमानाने जाण्यासाठी 45 मिनिटे लागतात. त्यामुळे ही ट्रेन विमानापेक्षाही जास्त फास्ट असेल. मुंबई ते पुणे यातील अंतर हे सुमारे 148 किलोमीटर आहे. 


या प्रकल्पामुळे प्रवाशांना चांगल्या आणि सुखकर प्रवासाचा अनुभव घेता येईल. एवढेच नाही तर यामुळे नवे रोजगारही तयार होणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की, चुंबकीय तंत्रज्ञानाची ही ट्रेन पॉवडर (ट्र्रॅक) बुलेट ट्रेनच्या दुप्पट वेगाने धावेल. ही ट्रेन व्हॅक्यूम ट्यूब सिस्टीममधून जाणाऱ्या कॅप्सूलसारख्या हायपरलूपमधून 1200 किमी प्रति तास वेगाने धावेल. कमी दाबाच्या या कॅप्सूलद्वारे घर्षण आणि कंपन कमी केले जाते त्यामुळे वेग वाढतो. सध्या या ट्रेनची चाचणी सुरू आहे. व्हर्जिन ग्रुपने मुंबई-पुणे हायपरलूप ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारसोबत करार केला आहे. याचे भाडे विमानप्रवासाच्या निम्मे असेल. मुंबई ते पुणे दरम्यान असणाऱ्या या हायपरलूपचे भाडे हे 1,000 ते 1,500 रूपयांपर्यंत असेल. 

मुंबई, पुणे, चेन्नई, बंगलोर, दिल्ली, चेन्नई, चंढीगढ अशा ठिकाणी हे ट्रेन धावेल. ही ट्रेन 2032-33 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. याबद्दलची माहिती ही कंपनीच्या सीईओ आणि को-फाऊंडर प्रणय लुनिया यांनी दिली. ही हायपरलूप ट्रेन बीकेसी म्हणजे वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सवरून धावेल आणि पुण्यातील वाकडपर्यंत जाईल. त्यामुळे ही ट्रेन कधी येईल याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.