Sangli Samachar

The Janshakti News

शरद पवारांनी 2004 बाबत जे सांगितलं ते धादांत खोटं; अजित पवार नेमकं काय म्हणाले?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २७ मे २०२४
2004 मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार नव्हता. तसेच, छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्ष फुटला असता तर शरद पवार म्हणाले होते. यावरुन अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवार हे खोटं बोलत आहेत, असं ते म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी 2004 बाबत जे सांगितलं ते धादांत खोट आहे. मला त्यावेळी वाटत होतं की भुजबळ मुख्यमंत्री होतील. त्यावेळी मी मुख्यमंत्री होण्यासाठी इंटरेस्टड नव्हतो. राष्ट्रवादीला 2004 साली मुख्यमंत्री पदासाठी संधी होती. आता आपले वरिष्ठ जे सांगत आहेत की त्यावेळी काहीजण नवे होते. तसं काही नव्हतं, असं अजित पवार म्हणाले.

1991 साली शरद पवार यांना संरक्षण मंत्री व्हावं लागलं. त्यावेळीं पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री पदासाठी नाव देण्यात आलं होतं, मात्र मध्येच सुधाकरराव नाईक यांचं नाव देण्यात आलं. त्यावेळी शरद पवार यांचं एक वर्ष सुधाकरराव नाईक यांनी काहीही ऐकलं नाही 2004 साली प्रफुल पटेल आणि शरद पवार यांना वाटलं असेल की आपलं आधीच कोणी ऐकत नव्हतं. त्यामुळं आता पुनः मुख्यमंत्री केलं तर आपलं कोण ऐकणार नाही. असं काहीतरी असेल, असं अजित पवार म्हणाले आहेत.

पराभव झाला तरी.. निकालाआधी अजित पवारांचा कार्यकर्त्यांना संदेश, सातारा राज्यसभेबद्दल केलं मोठं वक्तव्य


छगन भुजबळ यांनी सांगितलं ते लक्षात घेतलं आहे. 10 जूनला अधिवेशन होणार होतं मात्र ते पुढे जाईल. सल्लागार समितीची बैठक घेण्याची विनंती केली होती. आम्ही कदाचित उद्या तारीख ठरवू, त्यामधे 10 जूनला अधिवेधन ठेवायचं की 17 जून तारीख करायची याबाबत निर्णय घेऊ. विभागीय मेळावे आपण घेणारं आहेत. विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करा, असं अजित पवार म्हणाले.

प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांनी उल्लेख केला त्यानुसार काही झालं तरी शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा आपण सोडणार नाही. मी स्वतः जे पी नड्डा, अमित शाह यांना सांगितलं होतं की आम्ही विचारधारा सोडणार नाही. आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर आपल्या सोबत आलो आहे, असं पवार म्हणाले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून देश बचाव संविधान बचाव रॅली काढली होती. त्यावेळीं मी मोर्चात सहभागी लोकांना विचारलं की संविधान बचाव मुद्दा कुठून आला, तर मला एकाने सांगितलं की तसं नरेटीव्ह सेट करायचं असतं. आता देखील असंच झालं आहे. अरे कसं काय संविधान बदलणार तुम्ही सांगा, असा सवाल त्यांनी केला.