Sangli Samachar

The Janshakti News

19 मे रोजी लव्ह जिहाद विरुद्ध मोर्चा, आ. राजासह उपस्थित राहणार !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ मे २०२४
मुंबई येथील मातंग समाजातील भगिनी कु. पूनम क्षीरसागर आणि कर्नाटक येथील लिंगायत समाजातील भगिनी कु. नेहा हिरेमठ यांच्या क्रूर हत्येचा जाहीर निषेध आणि एकूणच 'लव्ह जिहाद'च्या निषेधार्थ भाग्यनगर येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत सकल हिंदू समाजाच्या वतीने १९ मे या दिवशी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भाजपचे आमदार श्री. नितेश राणेही उपस्थित रहाणार आहेत. हा मोर्चा सायंकाळी ५ वाजता झुलेलाल चौक येथून प्रारंभ होईल. दीनानाथ चौक, मारुति चौक, बालाजी चौक, कापडपेठ, स्टेशन चौक मार्गे जाऊन राममंदिर येथे त्याचे सभेत रूपांतर होईल.


कु. नेहा हिरेमठ आणि कु. पूजा क्षीरसागर यांच्या हत्येचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण व्हावे, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून गुन्हेगारांना लवकरात लवक मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, 'लव्ह जिहाद' थांबवण्यासाठी कठोर कायदा करावा, सांगलीत 'वक्फ-बोर्ड'ने अवैधरित्या बळकवलेल्या भूमी महाराष्ट्र सरकारने परत घ्यावात, या तसेच अन्य मागण्या यात करण्यात येणार आहेत.