Sangli Samachar

The Janshakti News

VVPAT च्या पेपर स्लिप मोजणी बाबत सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस



सांगली समाचार-  दि. २ एप्रिल २०२४
नवी दिल्ली  - निवडणुकीत सर्व व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) पेपर स्लिपची मोजणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आली आहे. काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. मात्र त्यांना वेळ देण्यात आला नव्हता. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने पाठवलेली ही नोटीस महत्त्वाची मानली जाते.


काँग्रेस नेते आणि माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबत एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. जयराम रमेश म्हणाले की, 'व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्यास नकार दिला होता. आमची मागणी होती की ईव्हीएमवर जनतेचा विश्वास वाढवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य जपण्यासाठी व्हीव्हीपॅट स्लिपचे १००% मॅचिंग करण्यात यावे (सर्व स्लिप मोजल्या जाव्या) या दृष्टीने हे नोटीस पहिले आणि महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र ते अर्थपूर्ण होण्यासाठी निवडणुका सुरू होण्यापूर्वीच या प्रकरणाचा निर्णय व्हायला हवा,'असेही ते म्हणाले.