Sangli Samachar

The Janshakti News

असाही मोदीभक्त हाताचे बोट कापून देवीला अर्पण केलं... कशासाठी ?



सांगली समाचार - दि ९ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संपून जगात लोकप्रिय आहेत. भारतात सुद्धा मोदींचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. ते नेहमीच मोदींची बाजू उचलून धरत असतात. भले विरोधक त्यांना अंधभक्त म्हणत असू देत. पण हे मोदीभक्त मुलींसाठी काहीही करायला तयार असतात. आता असाच एक मोदी भक्त समोर आला आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून या चाहत्याने देवीला नवस बोलला आहे आणि एवढच नव्हे तर आपल्या हाताचे बोट कापून ते देवीला अर्पण केलं आहे. अरुण वेर्णेकर असं या व्यक्तीचे नाव असून तो कर्नाटकात राहतो.

अरुण वेर्णेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर देखील बांधले आहे आणि नियमितपणे विशेष पूजा करतात. आपले बोट तोडल्यानंतर, वर्णेकरांनी आपल्या रक्ताचा वापर करून घराच्या भिंतीवर देवी काली माते कडे 'मोदी बाबा'चे रक्षण करण्याची विनंती केली. पंतप्रधान मोदी हे महानतेचे प्रतिक आहेत असे ते मनापासून मानतात आणि "मोदी बाबा सबसे महान" असे लिहून त्यांनी विश्वास व्यक्त केला. भिंतीवर त्यांनी 'मां काली माता, मोदी बाबा का रक्षा करो' असेही लिहिले आहे.



अरुण वेर्णेकर यांनी मोदींचे तोंडभरून कौतुक केलं आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून आपल्या शेजारील राष्ट्रांच्या कुरघोड्या कमी झाल्या, तसेच जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे श्रेय सुद्धा मोदींनाच जाते, असं म्हणत देशाची प्रगती मोदींच्या नेतृत्वावर अवलंबून आहे असा विश्वास अरुण वेर्णेकर यांनी व्यक्त केला. यापूर्वी काश्मीरमधून नेहमीच दहशतवादी कारवाया आणि सैनिकांच्या मृत्यूच्या बातम्या येत होत्या, पण आता हा प्रदेश शांत आहे. देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुन्हा गरज आहे असेही त्यांनी म्हंटल.