Sangli Samachar

The Janshakti News

भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त भव्य शोभा यात्रेचे आयोजन



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१८ एप्रिल २०२४
भगवान महावीर यांच्या २६२३ व्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त सांगली शहरातील जैन समाजातील दिगंबर, श्वेतांबर, स्थानक्यासी, तेरापंथी, इ. सर्व पंथीयांच्या वतीने एकत्र भव्य मिरवणूक रविवार दि. २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.३० वाजता आमराई जवळील जेठाभाईवाडी येथून निघणार आहे.

सांगलीत निघणाऱ्या या भव्य शोभा यात्रेच्या माध्यमातून भ. महावीरांचा शांती संदेश सर्वापर्यंत पोहोचविण्याचे कार्य संप्पन्न होणार आहे. या भव्य शोभा यात्रेत रथ, चांदीचे रथ आर्षक सजावटीनी सजवलेली भगवान महावीर यांची पालखी, पंचमेरु, समाजप्रबोधनात्मक देखावे याचा समावेश असणार आहे. ही मिरवणुक श्री. जेठाभाईवाडीपासून सुरु होऊन हायस्कुल रोड गणपतीपेठ टिळक स्मारक मंदिर हरभट रोड कापडपेठ रोड राजवाडा चौक रॉकेल लाईन श्रीमती कळंत्रेआक्का जैन महिलाश्रम या मार्गाने जाऊन भ. आदिनाथ जिनमंदिर महावीरनगर सांगली येथे विसर्जित होईल.


भ. महावीर जन्मकल्याणकनिमित्त कच्छी जैन भवन येथे सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तसेच सिव्हील हॉस्पीटल, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, रिमाडहोम येथे अन्नदान व फळवाटप केले जाणार आहे. त्याचप्रमाणे यादिवशी सर्व कत्तलखाने, मांसविक्री, दुकाने बंद ठेवणेबाबत मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देणेत आले आहे.

सांगलीत निघणाऱ्या या भव्य मिरवणुकीत सर्व जैन धर्मिय स्त्री पुरुष, युवकयुवती यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शेठ रा.ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंगचे चेअरमन मा.प्रा. राहूल महावीर चौगुले. व जैन श्वेतांबर पार्श्वनाथ देहरासर ट्रस्टचे चेअरमन मा. श्री. सुभाष शाह यांनी केले आहे. या भव्य मिरवणुकीत शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग, सांगली, श्री. १००८ भगवान नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर, नेमिनाथनगर, सांगली, श्री. १००८ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जिनमंदिर, गावभाग, सांगली, श्री. १००८ भगवान शांतिनाथ दिगंबर जिनमंदिर, दत्तनगर, सांगली, श्री. १००८ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जिनमंदिर, पार्श्वनाथनगर, सांगली, श्री. १००८ पार्श्व पदमावती मंदिर, पदमावती कॉलनी धामणी रोड, सांगली, श्रीमती कळत्रेआक्का जैन श्राविकाश्रम, श्री. जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, श्री. महावीर स्वामी जैन श्वेतांबर जैन मुर्तीपूजक संघ, सांगली श्री, अमिझरा पार्श्वनाथ देहारासर ट्रस्ट, श्री. शत्रुजय आदिश्वर जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, जैन श्वेतांबर स्थानकवासी संघ, कच्छी जैन श्वेतांबर संघ, या मित्र संघटनांचे सदस्य सहभागी होणार आहेत.

सदर पत्रकार परिषदेस जैन बोर्डीग सांगलीचे व्हा. चेअरमन प्रशांत अवधुत, सेक्रेटरी अॅड. मदन पाटील, जॉ. सेक्रेटरी संदिप हिंगणे, विशाल चौगुले, जैन श्वेतांबर देहरासर मंदिरचे, जतिन शहा, रोहन मेहता, श्रीमती कळत्रेआक्का जैन महिलाश्रमचे चेअरमन श्रीमती अनिता पाटील, सेक्रेटरी श्रीमती छाया कुंभोजकर, सुनिता चौगुले, विना आरवाडे, सुरेखा मुंजाप्पा, विजया कर्वे, इ. उपस्थित होते.