Sangli Samachar

The Janshakti News

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी पोहोचले घोड्यावरून !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१९ एप्रिल २०२४
स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व शेतकरी नेते महेश खराडे हे चक्क घोड्यावरून अर्ज भरण्यासाठी दाखल झाले. त्यांच्यासमवेत मोठ्या प्रमाणावर शेतकरी राजा दिसत होता. यावेळी राजू शेट्टी आणि महेश खराडे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयजयकाराने सारा परिसर दुमदुमून गेला होता.


महेश खराडे यांनी सांगली जिल्ह्यात ज्या पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढवली, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकार व प्रशासनाला धारेवर धरले व अनेक प्रश्न मार्गी लावले. कृषी प्रदर्शनच्या माध्यमातून खराडे यांनी शेतकऱ्यांना आधुनिकतेची जोडले. त्याचप्रमाणे शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून, अत्यंत धडाडीने काम केले. ऊसाला योग्य भाव मिळावा म्हणून खराडे चक्क सहकारी साखर कारखान्याच्या उसाच्या गोणीत उतरले. या साऱ्या प्रकरणात खराडे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. पण कशाचीही परवा न करता माजी खासदार व शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आगेकूच सुरू ठेवली. त्यामुळे शेतकऱ्यात त्यांच्यावर सॉफ्ट कॉर्नर असून शेतकरीचे मते खराडे यांच्याच पारड्यात पडतील. तसेच महायुती व महाआघाडी यांच्यातील अंतर्गत वादाचा महेश खराडे यांना फायदा अशी चर्चा सर्वत्र दिसून येत आहे.