Sangli Samachar

The Janshakti News

पै. चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सांगलीत महाआघाडीचा मेळावा !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई, दि.१४ एप्रिल २०२४ - महाविकास आघाडीमध्ये कुणीतरी मिठाचा खडा टाकत आहे म्हणून महाविकास आघाडीच्या विजयासाठी सर्वांनी एकत्र येणे खूप गरजेचे आहे. महाविकास आघाडीच्था मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगलीची जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेला मिळाली. येथे महाविकास आघाडीचे पै. चंद्रहार पाटील हे महाआघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराची पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या १५ तारखेला दुपारी ३ वाजता महाविकास आघाडीचा मेळावा येथील भावे नाट्यमंदिर मध्ये आयोजित करण्यात असल्याची माहिती, सांगली जिल्हा ठाकरे भेटायचे शिवसेना प्रमुख संजय विभुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना संजय विभवते पुढे म्हणाले की झाले गेले विसरून आता विशाल पाटील यांनी मोठे मन करून महाविकास आघाडीच्या प्रचाराची भरा आपल्या खांद्यावर घ्यावी. गेले दोन आठवडे उमेदवारीचा घोळ चालू होता परंतु आता तो संपला आहे. साहजिकच विशाल पाटील यांच्या भावना दुखावल्या असतील परंतु आता ती वेळ निघून गेली आहे. त्यांनी आपली सर्व जबाबदारी डॉ. विश्वजीत कदम यांच्यावर सोपवली आहे, परंतु आपली खरी लढाई ही जातीयवादी भाजपाशी आहे. भाजपाला हरवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येण्याची गरज आहे. 


या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी डॉ. विश्वजीत कदम, आ. विक्रम सिंह सावंत, आ. महेंद्रअण्णा लाड, आ. सुमन ताई पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील या सर्वांना सन्मानपूर्वक निमंत्रण देण्यात येणार असल्याचे संजय विभुते यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेसाठी संजय विभुते यांच्याबरोबर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.