Sangli Samachar

The Janshakti News

नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त गणेश मंदिर संस्थानतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल



सांगली समाचार - दि. १ एप्रिल २०२४
डोंबिवली (विद्या कुलकर्णी) - भारतीय संस्कृती परंपरेचे पालन करत यंदाही श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे २०२३-२०२४ह्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त अनेकविध उपक्रमांचे आयोजन विश्वस्त मंडळातर्फे केलेले आहे.डोंबिवलीची ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिराचे १०० वे वर्ष असून स्वागत यात्रेचे २६ वे वर्ष आहे. गुढीपाडवानिमित्त स्वागत यात्रेची मुहूर्तमेढ डोंबिवलीतून रोवली गेली. त्यानंतर राज्य नव्हे तर देशभरात स्वागतयात्रेची परंपरा सुरू झालीय. डोंबिवलीच्या स्वागतयात्रेची राज्यातच नव्हे तर देशभरात उत्सुकता असते. यंदा ४ एप्रिलपासून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.
यंदा नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या चित्ररथसाठी *रामराज्य आणि नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये हा* विषय देण्यात आलेला आहे. या स्वागत यात्रेत ६५ पेक्षा जास्त चित्ररथ आणि त्याहून जास्त डोंबिवलीतील नामांकित संस्था या स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत.


स्वागत यात्रेच्या निमित्ताने गीता पठण ,महिला पुरुषांसाठी भजन स्पर्धा ,महिलांसाठी फ्लॉवर डेकोरेशन ,ज्येष्ठ नागरिकांसाठी अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहा एप्रिलपासून कार्यक्रम सुरू होणार असून श्रीसूक्त पठण ,दीपोत्सव ,७ एप्रिल रोजी श्रीगणपती अथर्वशीर्ष पठण ,सायंकाळी बाईक रॅली ,श्री गणपती अथर्वशीर्ष पठण ,तसेच संस्कारभारतीतर्फे महारांगोळी , ८ एप्रिल रोजी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन ,त्यानंतर नामवंत विधीज्ञ व जेष्ठसरकारी उज्वल निकम या विषयावर ज्येष्ठ विधितज्ञ एड उज्वल निकम यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे घेणार आहेत.

यंदा नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या चित्ररथसाठी रामराज्य आणि नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये हा विषय देण्यात आला असून ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता श्री गणरायाची महापूजा त्यानंतर पालखीपूजन होईल त्यानंतर पालखी भागशाळा मैदानात नेण्यात येणार. तेथून स्वागत यात्रा सुरू होईल, ती पावणे करा वाजण्याच्या सुमारास अप्पा दातार चौक येथे स्वागत यात्रेचा समारोप होणार आहे. यंदा डोंबिवली गणेश मंदिर संस्थानचे १०० वे वर्ष आणि रौप्यमहोत्सवी सांगता सोहळा हा दुग्धशर्करा योग लाभलेल्या गणेश मंदिराची स्वागत यात्रा स्मरणीय व्हावी यासाठी यंदा गणेश मंदिर संस्थानच्या वतीने अल्प दरात आरोग्य सुविधा केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत गणेश मंदिर संस्थानाचे अध्यक्षा अलका मुतालिक, कार्यवाह प्रवीण दुधे आणि संयोजन समिती प्रमुख दत्तात्रय भोंडे यांनी दिली .
सदर पत्रकार परिषदेला विश्वतमंडळाचे उपाध्यक्ष सुहास आंबेकर , कोषाध्यक्ष राजय कानिटकर, राहुल दामले, गौरी खुंटे,आनंद धोत्रे श्रीपाद कुलकर्णी, निलेशसावंत,दिपाली काळे यांची उपस्थिती होती.