Sangli Samachar

The Janshakti News

महिलांवर गलिच्छ भाषेत आरोप करणारे हिरो बनण्याच्या प्रयत्नात झिरो झाले - नीलम गोऱ्हे



| सांगली समाचार वृत्त |
वाशिम  - दि.२१ एप्रिल २०२४
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमीच कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत येतात. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्या सध्या वाशिमच्या दौऱ्यावर आहेत.तिथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नवनीत राणांवर संजय राऊत यांनी केलेल्या टिकेवरून नीलम गोऱ्हे यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

स्वतःला हिरो बनवण्याच्या नादात झिरो होत आहेत

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिलांवर गलिच्छ भाषेमध्ये आरोप करणारे काही लोक स्वतःला हिरो बनवण्याच्या नादात झिरो होत चालले आहेत. एका महिलेबद्दल लोकप्रतिनिधीने अशा भाषेचे वापर करून टीका करणे हे अजिबात योग्य नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य राहील आणि याबाबत निवडणूक आयोग दखल घेऊन योग्य ती कारवाई करेल. तसेच अशा काही लोकांच्या सकाळच्या डराव- डरावमध्येही काही तथ्य नसतं. त्यामुळे त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.


कुटुंबातील महिलांना असे शब्द बोललेले चालेल का ?

काहींना असं वाटतं आपण शिवराळ भाषा बोलून हिरो ठरतो. मात्र महिलांबद्दल असे वाईट बोलणारे झिरो आहेत. राऊतांवर आरोप करणाऱ्या महिलांना त्यांनी किती गल्लीछ भाषेत शिविगाळ केली आम्ही एकल आहे. आपल्या कुटुंबातील महिलांना चालतील एवढेच शब्द इतर कुटुंबातील महिलांना वापरावे. संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबद्दल वापरलेले शब्द पुन्हा पुन्हा वापरणे योग्य नाही. त्यामुळे त्यांचा अपमान होईल. म्हणून मी ते शब्द बोलत नाही. मात्र त्यांनी केलेला शब्द प्रयोग हा अतिशय चुकीचा आणि एका महिलेचा अवमान करणार आहे, त्यामुळे याची निवडणूक आयोगाकडून दाखल घेऊन तात्काळ कारवाई केली जाईल, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्यावर अनेक टीका देखील करण्यात आल्या. त्यावेळी संजय राऊत यांनी म्हंटले होते, मातोश्रीविषयी अपशब्द वापरले, हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले. त्या बाईचा पराभव करणं शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आणि नैतिक कर्तव्य आहे. ती नाची.डान्सर. बबली.तुम्हाला खुनावेल. पडद्यावरून इशारे करेल. पण हुरळून जाऊ नका.. अशा एका नटीने विश्वामित्रांनाही फसवले होते,असे संजय राऊत म्हणाले.