Sangli Samachar

The Janshakti News

तुमच्या फोनमधील कोणतं अ‍ॅप वापरतंय सगळ्यात जास्त बॅटरी?सांगली समाचार - दि ६ एप्रिल २०२४
मुंबई  - आजकाल सर्वच गोष्टींसाठी स्मार्टफोनचा वापर होतो. त्यामुळे बहुतांश लोक घरातून निघताना फोनचं चार्जिंग फुल असेल याची खात्री करतात. तरीही काही तासांमध्येच फोनची बॅटरी कमी होते. फोनचं चार्जिंग किती वेगाने कमी होईल हे त्याच्या वापरावर अवलंबून असतं. मात्र, काही अ‍ॅप्स असेही आहेत, जे बॅकग्राउंडला तुमच्या फोनची बॅटरी खातात. फोनचं चार्जिंग किती वेगाने कमी होईल हे त्याच्या वापरावर अवलंबून असतं. मात्र, काही अ‍ॅप्स असेही आहेत, जे बॅकग्राउंडला तुमच्या फोनची बॅटरी खातात. तुमच्या फोनमधील कोणतं अ‍ॅप किती प्रमाणात बॅटरीचा वापर करतं हे पाहण्याची सोय तुमच्या फोनमध्येच आहे. याठिकाणी तुम्ही कोणतं अ‍ॅप अधिक प्रमाणात बॅटरीचा वापर करत आहे हे पाहू शकता. तसंच त्यातील गरज नसणारं अ‍ॅप बंद करुन, तुम्ही चार्जिंग वाचवू शकता.

असे तपासा अ‍ॅप्स

यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला फोनच्या सेटिंग्समध्ये जावं लागेल. यानंतर स्क्रोल डाऊन करुन बॅटरी हा पर्याय निवडा. तुम्हाला स्क्रीनवर बॅटरी पर्सेंटेज, शिल्लक चार्जिंग, तसंच गेल्या 24 तासांमधील बॅटरी यूजेस दिसतील.

याखाली Battery Usage by App हा पर्याय दिसेल. त्यावर .

यानंतर तुम्हाला सर्वाधिक बॅटरी वापरणाऱ्या अ‍ॅप्सची यादी दिसेल.

यामध्ये इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, गुगल असे अ‍ॅप्स दिसतील.

ही यादी प्रत्येक यूजरसाठी वेगळी असेल. तुम्ही कोणतं अ‍ॅप सर्वाधिक वापरता त्यानुसार ही यादी बदलेल.

Mobile Finger Pain : मोबाईल वापरुन बोटं दुखतायत? गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण.. वेळीच घ्या खबरदारी
अशी वाचवा बॅटरी

याठिकाणी सेटिंग्समध्येच तुम्हाला Optimize Battery Usage हा पर्याय दिसेल.

यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही पर्याय सांगण्यात येतील.

Change Screen Refresh Rate हा पर्याय वापरुन तुम्ही बॅटरी लाईफ काही प्रमाणात वाढवू शकता.

Turn Off Location Service हा पर्याय देखील मोठ्या प्रमाणात बॅटरीची बचत करतो. मात्र यामुळे तुमच्या फोनची लोकेशन सर्व्हिस बंद होईल.

याव्यतिरिक्त तुम्ही बॅटरी ड्रेनिंग अ‍ॅप्स बंद करण्याचा पर्याय वापरु शकता.