Sangli Samachar

The Janshakti News

प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना महत्वाचा सल्ला



सांगली समाचार - दि ९ एप्रिल २०२४
नवी दिल्ली  - निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (पीके) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ब्रेक घेण्याचा सल्ला दिलाय. याविषयी बोलताना त्यांनी जर यंदाच्या निवडणुकीतही काँग्रेसला निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागले तर राहुल गांधींनी बाजूला होऊन ब्रेक घ्यावा से स्पष्ट मत प्रशांत किशोर यांनी मांडले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी, ‘राहुल गांधी गेल्या 10 वर्षांपासून काँग्रेसला अयशस्वीपणे चालवत आहेत. यानंतरही ते बाजूला होऊन पक्षाची कमान दुसऱ्याकडे सोपवायला तयार नाहीत. जेव्हा तुम्ही गेली 10 वर्षे तेच काम करत असाल आणि त्यात तुम्हाला यश येत नसेल तर, तेव्हा तुम्ही ब्रेक घेण्यात काही गैर नाही. तेच काम तुम्ही दुसऱ्याला 5 वर्षे करू द्यावे असे प्रश्नत किशोर यांनी यावेळी म्हटले आहे,

‘…तरच मदत करता येईल’ 
‘जगभरातील चांगल्या नेत्यांचा एक चांगला गुण म्हणजे ते उणीवा स्वीकारतात आणि त्या दूर करण्याचा सक्रिय प्रयत्नही करतात. पण राहुल गांधींना सर्व काही माहीत आहे, असे वाटते. सत्य हे आहे की जर तुम्हाला वाटत नसेल की तुम्हाला मदतीची गरज आहे, तर कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही. असे म्हणत राहुल गांधींच्या कामावर टिप्पणी केली.

पक्षांतर्गत निर्णय घेता येत नाहीत 

राहुल गांधींकडून मतभेदाबद्दल पीके म्हणाले, ‘अनेक नेते वैयक्तिकरित्या कबूल करतात की ते ‘xyz’ च्या मंजुरीशिवाय पक्षात कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. काँग्रेस आणि त्यांचे समर्थक कोणत्याही व्यक्तीपेक्षा वरचढ आहेत. वारंवार अपयश येऊनही पक्षासाठी एकट्याने काम करावे लागेल, असा आग्रह राहुल गांधींनी धरू नये. असे त्यांनी म्हटले.

काँग्रेसच्या पराभवाचे खापर पीके काय म्हणाले?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष निवडणुकीतील अपयशाचे खापर निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था आणि माध्यमांवर फोडतात, या राहुल गांधींच्या दाव्यावर प्रशांत किशोर यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर पीके म्हणाले की, यात काही अंशी तथ्य असू शकते, परंतु ते पूर्ण चित्र मांडत नाही. 2014 च्या निवडणुकीत सत्तेत असूनही काँग्रेसच्या 206 जागांवरून 44 जागा घसरल्या. त्यावेळी भाजपचा संस्थांवर मर्यादित प्रभाव होता. यावरून आपण काय अर्थ काढू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.