Sangli Samachar

The Janshakti News

पहिल्याच तारखेपासून सुट्ट्या घेऊन येतोय मे महिना! ही घ्या पुढच्या महिन्यातील सर्व सुट्ट्यांची यादी !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० एप्रिल २०२४
एप्रिल महिना संपायला आलाय. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यायत आणि सुट्टी पडलीय. आता निकालाची पाट पाहिली जाते. शहरात उन्हाचा पारा कमी व्हायचे नाव घेत नाहीय. यात गावाकडे जाण्यासाठी सुट्ट्यांचं प्लानिंग अनेकजण करत असतात. अशावेळी अनेकांना स्वत:ची बॅंकाची कामेदेखील आटपायची असतात. त्यामुळे 1 मे रोजी सुट्टी आहे का? मे महिन्यात एकूण किती सुट्ट्या आहेत, असे अनेक प्रश्न तुम्हालादेखील पडले असतील. तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. 

बुधवार 1 मे दिवशी महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मणिपूर, केरळ, बंगाल, गोवा आणि बिहारमध्ये बॅंकांना सुट्टी असेल. यात 1 मे रोजी महाराष्ट्र भरात कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा केला जाईल. त्यामुळे महाराष्ट्रात तसेच काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

8 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त बँका बंद राहणार आहेत. तर १० मे रोजी अक्षय्य तृतीया सणानिमित्त बँकांना सुट्टी असेल. 23 मे बुद्ध पौर्णिमेनिमित्त बँकांसंबंधित व्यवहार तुम्हाला करता येणार नाहीत. तर त्याच्या दुसऱ्या शनिवारी म्हणजेच 11 मे रोजी बँका बंद राहतील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मे महिन्याच्या चौथ्या शनिवारी 25 मे रोजी बँकांना सुट्टी असेल. या व्यतिरिक्त 4,12,18 आणि 26 मे रोजी रविवार असल्याने बॅंका बंद असतील. 

बॅंकाच्या आतील व्यवहार बंद असले तरी इंटरनेट बॅंकींग, मोबाईल बॅंकींगच्या मदतीने तुम्हाला बॅंकेचे व्यवहार करता येणार आहेत. तुम्ही टेक्नोसेव्ही असाल तर तुम्हाला घरबसल्या कॅश ट्रान्सफर, अकाऊंट ओपनिंग अशी विविध कामे करता येतील. यासोबत बॅंका बंद असल्या तरी त्याच्या एटीएम सुविधेवर कोणता परिणाम होणार नाही. तुम्हाला कॅश काढताना कोणती अडचण येणार नाही, याची नोंद घ्या. 

शालेय सुट्ट्या 

सुट्ट्या हा शालेय विद्यार्थ्यांच्या आवडीचा विषय असतो. शैक्षणिक वर्ष सुरु झालं की शाळेच्या डायरीत सर्वात आधी विद्यार्थ्यांकडून सुट्ट्या शोधल्या जातात. शालेय विद्यार्थ्यांना 2024-25 या शैक्षणिक वर्षात किती सुट्ट्या आहेत तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांना 2 मे ते 14 जून या काळात उन्हाळी सुट्ट्या असतील. दरम्यान सीबीएसई बोर्डच्या विद्यार्थ्यांना 1 मे ते 1 जूनपर्यंत सुट्ट्या असणार आहेत.