Sangli Samachar

The Janshakti News

डॉ. तारा भवाळकर यांना, अ.भा. मराठी प्रकाशक संघाचा साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२२ एप्रिल २०२४
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा 'साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार' यावर्षी लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 


हा पुरस्कार गुरुवार दिनांक २५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता, डॉ. अनिल मडके यांचे श्वास हॉस्पिटल, गारपीरजवळ, सिव्हील हॉस्पिटल मागे, सांगली येथे कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे या प्रकाशान संस्थेच्या संचालिका व मराठी प्रकाशक संघाच्या संचालिका अमृता अमृता कुलकर्णी यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा डॉ. अनिल मडके यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक अविनाश सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या सोहळ्यास सांगली परिसरातील साहित्य, प्रकाशन व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन राजीव बर्वे यांनी केले आहे.