Sangli Samachar

The Janshakti News

मोदीजीच म्हणताहेत, इंडिया महाआघाडी २-० ने पुढे, जनता व कार्यकर्त्यांत संभ्रम ?



| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि.२८ एप्रिल २०२४
400 पार, आमच्याकडे मोदींचा चेहरा अशा कितीही वल्गना भाजप करीत असली तरी लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपची आणि त्यांच्या मित्रपक्षांची अवस्था केविलवाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच अस्वस्थ असल्याचे आज कोल्हापुरात पाहायला मिळाले.

आपल्या भाषणात बोलताना नरेंद्र मोदीजी म्हणाले की कोल्हापूर हे फुटबॉल हब आहे. आणि पूर्वाच्याच भाषेत सांगायचे तर इंडिया आघाडी २-० ने पुढे आहे, त्यामुळे आता कोल्हापूर मसह महाराष्ट्रातील मतदारांनी भाजपाला पूर्ण ताकतीने मतदान करायचे आहे.


शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापुरातील तपोवन मैदानावर शनिवारी सायंकाळी पंतप्रधान मोदींची सभा झाली. यावेळी मोदींनी नेहमीप्रमाणे काँग्रेससह 'इंडिया' आघाडीतील पक्षांवर तेच तेच आरोप केले. 'कर्नाटकात एका रात्रीत मुसलमानांना ओबीसी बनविले. कर्नाटक व तामीळनाडू असा दक्षिण भारत नवा देश निर्माण करून देशाचे दोन तुकडे विरोधक करू इच्छितात,' असा नवाच जावईशोध पंतप्रधानांनी लावला. भाषणाच्या शेवटी पंतप्रधान मोदी किती अस्वस्थ आहेत, हे सभेसाठी आलेल्या कोल्हापूरच्या जनतेने पाहिले. 'सभा संपल्यानंतर गावात जाऊन आप्तस्वकीय, मित्रमंडळींना भेटा आणि त्यांना सांगा, मोदी कोल्हापुरात आले होते. मोदींना मताच्या रूपाने आशीर्वाद द्यायला सांगा,' अशी विनंती त्यांनी केली.

एकंदर मोदींच्या या सभेने भाजपा व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताकद देणे ऐवजी त्यांच्यात संभ्रम निर्माण करणारी ठरली. सध्या सर्वत्र मोदींची सभा, त्यांचे भाषण आणि त्यातील अन्वयार्थ याबाबत चर्चा होत आहे.