Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्रातील ६ हजार ६३० मतदार प्रथमच घरबसल्या मतदान करणार !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.१८ एप्रिल २०२४
महाराष्ट्रात दिव्यांग आणि वृद्ध मिळून ६ हजार ६३० मतदार गृहमतदान सुविधेचा लाभ घेऊन घरातूनच मतदान करणार आहेत. ८५ वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींना घरातूनच मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच गृहमतदानाची सुविधा देण्यात येणार आहे. १९ एप्रिल या दिवशी महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघामध्ये एकूण ९५ लाख ५४ सहस्र ६६७ मतदार आहेत.


८५ वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींना घरातूनच मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच गृहमतदानाची सुविधा देण्यात येणार आहे. १९ एप्रिल या दिवशी महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघामध्ये एकूण ९५ लाख ५४ सहस्र ६६७ मतदार आहेत.