| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.१७ एप्रिल २०२४
काँग्रेस अपक्ष आहे का, ते मला माहिती नाही. जर कोणी बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या विरोधात काम करत असेल, तर त्या पक्षाने त्यावर कारवाई केली पाहिजे. जर एखाद्या पक्षाचा उमेदवार बंडखोरी करत असेल, महाविकास आघाडीच्या ठरलेल्या निर्णयाविरोधात भूमिका घेत असेल आणि महाविकास आघाडीच्या पक्षातील लोक त्याच्यासोबत उभी राहत असतील, तर मला असे वाटते की, पक्षात जी शिस्तभंगाची भूमिका असते, ती घ्यायला हवी. त्या सगळ्यांची हकालपट्टी करायला हवी. मग पक्ष कोणताही असो.
सांगलीत ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तरीही या जागेसाठी काँग्रेस अद्यापही आग्रही आहे. ठाकरे गटाने निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून केली जात आहे. या घडामोडींमध्ये विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नाही. विशाल पाटील यांनी एक काँग्रेस व एक अपक्ष असे दोन फॉर्म भरले. यावरून संजय राऊतांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देताना कोणी बंडखोरी करत असेल तर पक्षाने कारवाई करावी, असे सुचवले.