Sangli Samachar

The Janshakti News

१०९१ कोटी ठेव उद्दीष्ट पुर्तीसह २६ कोटी १ लाखाचा ढोबळ नफा - रावसाहेब पाटीलसांगली समाचार दि. ४ एप्रिल २०२४
सांगली :- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगलीने मार्च २०२४ अखेर रु. १०९१ कोटी ठेव उद्दीष्ट पुर्तीसह २६ कोटी १ लाखाचा ढोबळ नफा मिळविल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली.

संस्थेच्या मार्च २०२४ अखेर प्रगती दर्शक आकडेवारीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ढोबळ नफयातून १२ कोटी ७६ लाखाची रक्कम निरनिराळया निधीकडे वर्ग करण्यात आली. त्यामुळे संस्थेचा स्वनिधी भक्कम झाला आहे. संस्थेचे वसुल भागभांडवल ३४ कोटी ८५ लाख आहे. संस्थेचा स्वनिधी १०६ कोटी २६ लाख झाला आहे.


आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीमध्ये १९१ कोटीची भरघोष वाढ होवुन संस्थेच्या ठेवी रु. १०९१ कोटी झाल्या आहेत. आर्थिक वर्षात कर्जामध्ये १८६ कोटीची वाढ होवून रु. ८११ कोटी चे कर्ज वाटप झाले आहे. संस्थेची गुंतवणुक ३७० कोटी आहे. संस्थेचे खेळते भांडवल १२८८ कोटी असून संस्थेचा एकूण व्यवसाय १९०२ कोटी झाला आहे. संस्थेची सभासद संख्या ६३९३८ इतकी आहे.

तरतुदीनंतर संस्थेला रु. १३ कोटी २५ लाख इतका निव्वळ नफा झाला आहे. संस्थेचा प्रतिसेवक व्यवसाय ५ कोटी ९४ लाख आहे.एन.पी.ए. चे प्रमाण ६ टक्के राहिले आहे. संस्थेला अत्यंत चांगला नफा झाल्यामुळे निधीसाठी चांगली तरतुद केली असून निव्वळ नफयातून देखील निधीसाठी तरतुद होवून संस्थेचा स्वनिधी भक्कम होणार असल्याचे मा. चेअरमन यांनी सांगितले.

आर्थिक वर्षात सभासद ठेवीदार, कर्जदार यांनी अतिशय चांगले सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. सर्व संचालक, सेवक यांचे प्रगतीमध्ये पुर्ण योगदान मिळाल्याने चेअरमन यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे संचालक अॅड. एस.पी. मगदूम, डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. ओ. के. चौगुले (नाना), श्री. वसंतराव धूळाप्पाण्णा नवले, डॉ. एस.बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे श्री. लालासो भाऊसाो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्या सह संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.