Sangli Samachar

The Janshakti News

कुपवाडच्या तरुणाची उदगाव येथे निर्घृण हत्या !सांगली समाचार - दि. १२ एप्रिल २०२४
कुपवाड - कुपवाड येथील तरुणाचा उदगाव (ता. शिरोळ) येथे भरदिवसा धारदार हत्याराने खून झाल्याची घटना उघडकीस आली. पाठलाग करुन दोघा तरुणांनी तरुणाचा खून केला. सचिन चव्हाण (वय २४) असे मृताचे नाव असून निर्भया पथकाच्या सतर्कतेमुळे दोघा संशयीतांना अटक करण्यात आली. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील खोत पेट्रोलपंपासमोर खुनाची ही घटना घडली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.


रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. पूर्ववैमनस्यातून हा खुन झाल्याचे समजते. सचिन हा खुनाच्या आरोपाखाली कारागृहात होता. महिनाभरापूर्वी तो जामिनावर सुटून आला होता. गुरुवारी जयसिंगपूर येथे तो गेला होता. कुपवाडला परत येत असताना, सांगली-कोल्हापूर महामार्गावर उदगाव हद्दीत असणाऱ्या खोत पेट्रोलपंपासमोर पाठलाग करणाऱ्यांनी सचिनला गाठले. यावेळी त्याची मोटारसायकल रस्त्यावर पडली. जीवाच्या भितीने तो शेजारील रस्त्याकडे असणाऱ्या एका फेब्रिकेशनच्या दुकानात गेला. मात्र संशयीतांनी दुकानात घुसून संशयीतांनी त्याच्यावर धारदार हत्याराने सपासप वार करुन त्याचा खुन केला. दरम्यान, पेट्रोलिंग करणा-या निर्भया पथकाने संशयीतांना पाठलाग करुन अटक केली.