सांगली - सफाईचे साहित्य आणण्यासाठी गोदामामध्ये गेलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्या महापालिकेच्या दोन सफाई कामगारांना सोमवारी अटक करण्यात आली.
अत्याचारानंतर गेल्या एक महिन्यापासून हे दोघेही परागंदा झाले होते. दोन महिन्यांपुर्वी पीडित सफाई साहित्य आणण्यासाठी गोदामात गेली असता दोघांनी एकटीला गाठून तिच्यावर अतिप्रसंग केला होता. याबाबत पीडितेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दि. ५ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून महापालिकेचे कर्मचारी वैभव कांबळे व निखिल कोठावळे हे दोघेही परागंदा झाले होते. आज त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली.