Sangli Samachar

The Janshakti News

मा संभाजीराव भिडे गुरुजी यांना संपूर्ण महाराष्ट्रात विशेष पोलीस सुरक्षा मिळावी - आ. सुधीर दादा गाडगीळसांगली समाचार -  दि. १ मार्च २०२४
सांगली - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी हे अखंड महाराष्ट्रात छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज तसेच हिंदू धर्माचे जागृती व प्रचारानिमित्त महाराष्ट्रभर दौरे करीत असतात. दि. 29 फेब्रुवारी रोजी मनमाड येथे दौऱ्यानिमित्त गेले असता, त्यावेळी त्यांच्या गाडीचा ताफा अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. असे यापूर्वीही वारंवार हल्ले त्यांच्यावर झाले आहेत. 

मा. भिडे गुरुजींच्या  सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाकडून संपूर्ण महाराष्ट्रभर विशेष पोलीस सुरक्षा मिळावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुधीर दादा गाडगीळ यांनी केली आहे.