Sangli Samachar

The Janshakti News

४० वर्षांपूर्वी झाले होते 'चारसो पार', आता इतिहासाची पुनरावत्ती होणार, की नवा इतिहास लिहिला जाणार ??सांगली समाचार - दि. ९ मार्च २०२४
नवी दिल्ली - लोकसभानिवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना सगळीकडे केवळ ४०० पारचा नारा दिसत आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाला ३७० पेक्षा जास्त, तर एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. कोणाला किती जागा मिळतील, हे येणाऱ्या काही महिन्यांत कळेलच, पण भूतकाळाबद्दल बोलायचे झाले तर यापूर्वी ४०० जागा जिंकून इतिहास रचण्यात आला आहे. १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला तब्बल ४०४ जागा मिळाल्या होत्या. एवढा मोठा आकडा गाठणे हे देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच आणि ऐतिहासिक ठरले होते. कोणाला किती जागा मिळतील, हे येणाऱ्या काही महिन्यांत कळेलच, पण भूतकाळाबद्दल बोलायचे झाले तर यापूर्वी ४०० जागा जिंकून इतिहास रचण्यात आला आहे. १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला तब्बल ४०४ जागा मिळाल्या होत्या. एवढा मोठा आकडा गाठणे हे देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच आणि ऐतिहासिक ठरले होते.

नेमके काय झाले ?

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात राजीव गांधी आणि काँग्रेसबद्दल सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट उसळली होती. त्याचा परिणाम म्हणून १९८४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ५१४ पैकी ४०४ जागा जिंकून इतिहास रचला. या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे ५,३१२ उमेदवार उभे होते. त्यापैकी १,२४४ राष्ट्रीय पक्षांचे आणि १५१ प्रादेशिक पक्षांचे होते. निवडणुकीत ३,७९१ अपक्ष उमेदवार उभे होते, त्यातील केवळ ५ लोकसभेत पोहोचले.


पंतप्रधान कोण झाले ?

इंदिरा गांधी यांची हत्या २१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या लॉनमध्ये त्यांच्याच दोन अंगरक्षकांनी केली होती. डिसेंबर १९८४ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. लोकसभेच्या ५१४ जागांसाठी २४-२८ डिसेंबर रोजी मतदान झाले. यानंतर राजीव गांधी यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली.

विरोधी पक्ष कोण ?

३० जागा जिंकून टीडीपी विरोधी पक्ष म्हणून संसदेत आला. प्रथमच एक प्रादेशिक पक्ष विरोधी पक्ष झाला होता. भाजपची ही पहिलीच निवडणूक होती१९८० मध्ये जनसंघापासून वेगळे होऊन भाजपची स्थापना झाली आणि पक्षाने कमळ हे निवडणूक चिन्ह म्हणून घोषित केले. १९८४ मध्ये भाजपने पहिली लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, या सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या पक्षाला कोणतीही छाप पाडता आली नाही. पक्षाने २२४ जागांवर लोकसभा निवडणूक लढवली होती, पण फक्त २ जागांवरच समाधान मानावे लागले होते.

भाजपची ही पहिलीच निवडणूक होती. १९८० मध्ये जनसंघापासून वेगळे होऊन भाजपची स्थापना झाली आणि पक्षाने कमळ हे निवडणूक चिन्ह म्हणून घोषित केले. १९८४ मध्ये भाजपने पहिली लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, या सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या पक्षाला कोणतीही छाप पाडता आली नाही. पक्षाने २२४ जागांवर लोकसभा निवडणूक लढवली होती, पण फक्त २ जागांवरच समाधान मानावे लागले होते.

ती एकमेव लोकसभा निवडणूक

१९८४ च्या निवडणुकीत २५.६२ कोटींपेक्षा अधिक मतदान झाले होते. ही २०१४ पर्यंतची शेवटची निवडणूक होती ज्यामध्ये एकाच पक्षाला बहुमत मिळाले होते. याशिवाय आजपर्यंतची ही एकमेव लोकसभा निवडणूक होती, जेव्हा एका पक्षाने ४०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या.