Sangli Samachar

The Janshakti News

"आयुष्याचे चित्र अपूर्णच राहते !"सांगली समाचार - दि. २९ मार्च २०२४
मुंबई - विश्वाच्या निर्मात्याने आयुष्याची रचनाच अशा प्रकारे केली आहे की जीवनात सर्वंकष यश देऊनही, जीवनाचे चित्र तो कुठेतरी जाणीवपुर्वक अपूर्ण ठेवतो. ही अपूर्णतेची उपस्थिती आपल्याला सतत जमीनीवरच रहा याची सतत आठवण करून देत असते. जगातील सर्वात श्रीमंतांपैकी अकराव्या स्थानी असलेले व आशिया खंडातील नंबर एकचे श्रीमंत उद्योगपती, रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबाणी याच्या जगातील सर्वात महागड्या विवाह सोहळ्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीला जगभरात चर्चा रंगली. जगभरातील सोशल मीडियावरही चर्चा झडल्या. 

या समारंभात पाहुण्यांना न्याहारी, दुपारचे जेवण, दुपारचा चहा, रात्रीचे जेवण आणि मध्यरात्री फराळासाठी 12,000 पदार्थ देण्यात आले. या कार्यक्रमात फिल्म इंडस्ट्रीतील सर्व सुपरस्टार डान्स करताना दिसले. जगभरातील प्रसिद्ध ग्लॅमरस व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती असूनही, मात्र सर्वांचे लक्ष शारिरीक व्यंगाने अवाढव्य असलेल्या अनंत अंबाणी वर होते. कारण त्याला एका गंभीर स्वरूपाच्या आजाराने ग्रासले आहे. की, ज्या आजाराचा पारंपारिक औषधांनी उपचार केला जाऊ शकत नाही. उपचारासाठी त्याला सतत स्टेरॉईड्स द्याव्या लागतात. या कॉर्टिकोस्टिरॉईड्स मुळे अनियंत्रित भूक लागते, ज्यामुळे व्यक्ती जास्त प्रमाणात अन्न सेवन करते. परिणामी त्याचे अनियंत्रित वजन वाढते. 


अब्जावधी डॉलर्सची संपत्ती असूनही, मुकेश अंबानींचा लाडका आणि धाकटा मुलगा अशा आजाराने ग्रस्त आहे ज्यासाठी स्टेरॉईड्सच्या दुष्परिणामांशिवाय या विश्वात दुसरा कोणताच उपाय नाही. अनंतला हत्तीसारख्या आजाराने ग्रासले आहे, तेव्हा मुकेश अंबानी यांनी हत्ती वरच्या उपचार, मनोरंजन, स्पा आणि मसाजच्या सुविधांनी भरलेल्या हजारो एकर जमिनीचे सफारी पार्कमध्ये रूपांतर केले. या सफारी पार्कमध्ये दररोज शेकडो टन सुका मेवा हत्तींना दिला जातो. मुकेश अंबानी यांच्या आजारी मुलासोबतच्या वैयक्तिक संघर्षाची ही फक्त एक झलक आहे.  सर्व सुखसंपत्ती पायाशी लोळण घेत असूनही तो आपल्या मुलासाठी संपूर्ण आरोग्याचा एकही दिवस विकत घेऊ शकत नाही. 

या समारंभात हजारो पाहुण्यांना संबोधित करताना मुकेश अंबानी म्हणाले की, त्यांचे जीवन हे गुलाबाची बिछाना नसून काट्याने भरलेला प्रवास आहे. मुकेश अंबानी हे शब्द बोलत असताना, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या चेहऱ्यावर कॅमेरा झूम इन झाला, त्याचा चेहरा खोल दुःखात बुडालेला दिसला, त्याच्या डोळ्यातून अश्रू झिरपतांना दिसत होते. त्या अश्रूंमधली वेदना आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती. अब्जावधी डॉलर्सची संपत्ती असूनही तो आपल्या मुलासाठी साध्या एका दिवसाचे पूर्ण आरोग्य ही विकत घेऊ न शकल्याचे शल्य जाणवत होते. किती अजब आहे हा निर्मात्याचा न्याय ? जीवनाचे चित्र तो कुठेतरी नकळत अपूर्णच ठेवतो. आणि या अपूर्णतेतच पूर्णत्वाचे सार आहे हे दर्शवतो…!

तात्पर्य - मुकेश अंबाणीच्या संपत्तीचा हेवा करण्याऐवजी, आपल्या ही जीवनातील अपूर्ण चित्रासाठी आपण निर्मात्याचे आभार मानायला हवेत. कारण अंबाणी च्या अपुर्ण चित्राइतके शल्यकारक चित्र आपले नाहीये.* 
*म्हणुन आपण जसे आहोत तसेच आनंदी होऊ या आणि जगंनियत्यांचे प्रती आभार आणि कृतज्ञता व्यक्त करूया......