Sangli Samachar

The Janshakti News

यापुढे शिवसेनेशी चर्चा नाही, विशाल पाटलांनी मैदानात उतरावे; काँग्रेस नेत्यांची ठाम भूमिका !सांगली समाचार - दि. २३ मार्च २०२४
मुंबई - " यापुढे शिवसेनेशी आम्ही कुठलीही चर्चा करणार नाही, करायचीच असेल तर ती केंद्रीय नेतृत्वाने करावी." असा पवित्र काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी घेतलेला आहे. कारण आहे, शिवसेनेचा. विशेषत: संजय राऊत यांचा आडमुठेपणा. कुणाच्यातरी सांगण्यावरून शिवसेनेने सांगलीच्या जागेवर आपला हट्ट धरला आहे. त्याचबरोबर भिवंडी व वर्धा या जागेचाही तिढा सुटलेला नाही. यामुळे महाआघाडीच्या चर्चेची गाडी येथेच अडलेली आहे.

सांगली मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत एकमत झालेले नसताना, तुम्ही परस्पर उमेदवार कसा जाहीर केला ? असा संतप्त सवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे गटाला केला आहे. आता आम्ही तुमच्याबरोबर चर्चा करणार नाही, तुम्ही दिल्लीतील आमच्या नेत्यासोबत चर्चा करा. अशा शब्दात काँग्रेसने संजय राऊत यांना सुनावले आहे. महाआघाडीच्या पहिल्या बैठकीपासूनच शिवसेनेची दादागिरी सुरू आहे. या बैठकीत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात ३० जागांची मागणी करून, आक्रमक धोरण स्वीकारले. यावेळी महाराष्ट्रातील नेत्यांनी सर्व जगात तुम्हीच लढवा आम्ही बाहेरून पाठिंबा देतो. असे सुनावल्याने राऊतांनी एक पाऊल मागे घेतले.


संजय राऊत जागा बाबत आवाज मागणी करत असल्याची तक्रार महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केले. परंतु यावर ठाकरे यांनी कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही, किंवा राऊत यांना रोखलेही नाही. पै. चंद्रहार पाटील हे विशाल पाटील यांच्यासाठी माघारी घेण्याची तयारी असतानाही, राऊत व ठाकरे यांनी सांगलीत येऊन जाहीरपणे पै. चंद्रावर पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले .यावरून राऊत यांच्या भूमिकेला ठाकरे यांचे समर्थन असल्यामुळे, राज्यातील काँग्रेसचे नेते संतापलेले आहेत.

आता विशाल पाटील यांनी सांगलीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रचार सुरू करावा, आम्ही ठामपणे तुमच्या बाजूने राहू असे सांगितले आहे. आगामी एक-दोन दिवसात जर हा तिढा सुटला नाही, तर सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील हे बंडखोरी करून अपक्ष म्हणून मैदानात उतरणार आहेत. साहजिकच जिल्ह्यातील व राज्यातील काँग्रेसच्या नेते मंडळींची त्यांना अधिकची रसद मिळणार आहे नक्की. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार. पण त्यात भाजी कोण मारणार ? हा औत्सुक्याचा व चर्चेचा विषय बनला आहे...