Sangli Samachar

The Janshakti News

संशोधकांनी शोधला पृथ्वीपेक्षा तीन पट अधिक पाणी असलेला ग्रह !सांगली समाचार - दि. ३ मार्च २०२४
वॉशिंग्टन - पृथ्वीवर जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक म्हणून मानले जाते. त्यामुळे राहण्यायोग्य ग्रहाचा शोध मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. ग्रहाचा शोध घेताना प्रथम त्या ग्रहावर पाणी आहे का याचा शोध घेतला जातो. मात्र अंतराळात माणसाला राहण्यायोग्य ग्रह शोधत असताना त्यांना पृथ्वीवरील पाण्यापेक्षा तीन पट अधिक पाणी असलेले ठिकाण सापडले आहे. HL Tauri नावाचा तारा 450 प्रकाशवर्षे अंतरावर आढळतो आणि त्याच्याभोवती प्रचंड प्रमाणात बाष्प आहे.अशा प्रकारच्या शोधाने संशोधकांनाही आश्चर्य चकित केले आहे.

साधारणपणे पाण्यामुळे पृथ्वीवर विकास झाल्याचे मानले जाते. त्यामुळेच दुसऱ्या राहण्यायोग्य ग्रहाचा शोध घेताना पाण्याला अधिक महत्त्व दिले जाते. पण आता संशोधकांनी एचएल टॉरी ताऱ्याजवळील एका डिस्कमध्ये पाणी शोधले आहे आणि पाणीही थोडथोडके नाही तर पृथ्वीवरील महासागरात असलेल्या पाण्यापेक्षा तीन पट अधिक पाणी शोधले आहे.


संशोधकांच्या म्हणण्यानुसार, एवढे पाणी असल्याने या पाण्याने ग्रह तयार होऊ शकतात; ज्यात फक्त पाणीच पाणी असेल. हा शोध संशोधकांनी सबमिलीमीटर चिलीच्या टेलिकस्कोपचा वापर करून लावला आहे. टेलिस्कोपच्या माध्यमातून ताऱ्यांची छायाचित्रे मिळवली आणि त्याच्या डिस्कमध्ये उपलब्ध पाण्याचा नकाशा तयार केला आहे. मिलान विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ स्टेफेनो फाचिनी म्हणाले की, मला असे कधीच वाटले नव्हते की पृथ्वीशिवाय इतर ग्रहाचा परिसर पाण्याने भरलेला असेल. हे संशोधन ‘नेचर ॲस्ट्रोनॉमी’ मध्ये प्रकाशित झाले आहे. हा तारा पृथ्वीपासून ४५० प्रकाशवर्षे दूर आहे. टॉरस तारामंडळातील हा तारा एचएल टॉरी आहे, त्याच्या चारही बाजूने पाणीच पाणी आहे.