Sangli Samachar

The Janshakti News

महिला ईश्वराचे दुसरे रूपभारतीय संस्कृतीत तर स्त्रीला घरात साक्षात लक्ष्मीचे स्थान दिलेले आहे. घर सांभाळणे, उपजीविकेसाठी काम करणे, पाहुणे असोत, नातेवाईक असोत, मित्रमंडळी असोत या सर्वांचा मान राखणे, त्यांची काळजी घेणे, घराला घरपण देणे हे सर्व ‘स्त्री’च करू जाणे. ही सर्व जबाबदारी समर्थपणे पेलायची असेल तर स्त्रीला तिचे ‘स्त्री’त्व जपायला हवे. कारण स्त्री संतुलनावरच स्त्रीची शक्‍ती, आरोग्य, उत्साह, सौंदर्य, स्वभावातील मृदुता या सर्व गोष्टी अवलंबून असतात. त्वचेच्या सुकुमारतेपासून ते आकर्षक बांध्यापर्यंत सर्व काही स्त्री-संतुलनाशी निगडित असते.   

 आठ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्री शिक्षण, स्त्री प्रतिष्ठा, स्त्री स्वातंत्र्य हे विषय विविध माध्यमांतून जनमानसात बिंबविण्याचा प्रयत्न केला जातो. आज एकविसाव्या शतकातील स्त्री कुठेही मागे राहणारी नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत तर स्त्रीला घरात साक्षात लक्ष्मीचे स्थान दिलेले आहे. घर सांभाळणे, उपजीविकेसाठी काम करणे, पाहुणे असोत, नातेवाईक असोत, मित्रमंडळी असोत या सर्वांचा मान राखणे, त्यांची काळजी घेणे, घराला घरपण देणे हे सर्व ‘स्त्री’च करू जाणे. ही सर्व जबाबदारी समर्थपणे पेलायची असेल तर स्त्रीला तिचे ‘स्त्री’त्व जपायला हवे. कारण स्त्री संतुलनावरच स्त्रीची शक्‍ती, आरोग्य, उत्साह, सौंदर्य, स्वभावातील मृदुता या सर्व गोष्टी अवलंबून असतात. त्वचेच्या सुकुमारतेपासून ते आकर्षक बांध्यापर्यंत सर्व काही स्त्री-संतुलनाशी निगडित असते. म्हणूनच आयुर्वेदात स्त्री संतुलनासाठी, स्त्री आरोग्यासाठी अष्टांगांपैकी एक संपूर्ण अंग-शाखा समर्पित केलेली आढळते. स्त्री संतुलन नीट सांभाळले तर तिला कुठला रोग होणारच नाही, पण काही त्रास होत असला तर तो बरा करण्यासाठी स्त्री संतुलनाकडे लक्ष द्यावेच लागते.


 एकोणीसाव्या शतकात, जगभरातील स्त्री वादी चळवळीने जोर धरला होता, त्याचवेळी भारतातही अनेक समाजधुरिणांनी स्त्रीवर होणा-या अन्यायाला वाचा फोडली. त्यामध्ये राजा राम मोहन रॉय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे विसरुन चालणार नाही.

      सतीप्रथा, केशवपन,बालविवाह अशा अनेक वाईट प्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. स्त्री शिक्षण, विधवा पुर्विवाह तसेच प्रौढ विवाह असे अनेक विषय समाजासमोर मांडण्यात येऊ लागले. त्याचेच फलित म्हणून विवाहाच्या वेळी मुलाचे किमान वय 16 ते 18 तर मुलीचे किमान वय 10 ते 12 असावे अशी तरतूद करण्यात आली.

     स्त्री शिक्षणाच्या चळवळीनेही जोर धरला. महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले व भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळविलेल्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले, यांचे योगदान फार मोठे आहे. समाजाचा प्रखर विरोध व त्यातून उद्भवलेल्या अनंत अडचणींना तोंड देत या पती-पत्नीने स्त्री शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात घातला.

     स्त्रिया विविध सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक विषयांमधे सहभागी होऊन आपले मत व्यक्त करू लागल्या

       सन 1902 मधे रमाबाई रानडे यांनी ' हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब'ची स्थापना केली तर 1904 मधे ' भारत महिला परिषदे'ची स्थापना झाली.या संघटना महिलांच्या अनेक समस्या व मागण्या यांचा पाठपुरावा करू लागल्या. त्यातूनच, प्रथम, संपत्तीदार स्त्रियांना मतदानाचा अधिकार, मग स्त्रियांना मतदानाबरोबरच निवडणूकीला उभे राहण्याचा अधिकार अशा सुधारणा सन 1935 पर्यंत होत गेल्या. भारतात 1943 साली पहिला महिला दिन साजरा करण्यात आला.

       स्वातंत्र्यानंतर, 1950 सालापासून भारतीय राज्य घटनेने, स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला आहे. संयुक्त राष्ट्रांनी सन 1975  हे जागतिक महिला वर्ष घोषित केले जे भारतातही साजरे झाले. 8 मार्च हा महिला दिन, जगभरातल्या अनेक देशांप्रमाणेच भारतातही साजरा केला जातो
स्रिया कितीही सबला आहेत असे मान्य केले तर अजुनही पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा आहेच . स्त्री अवकाशातून किंवा अथांग समुद्रातून तरंगू लागली तरीही तिला आजही कमी लेखले जाते . 
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्री असते हे त्रिकालबाधित सत्य असले तरीही पुरुष आपला मी पणा कधीच सोडायला तयार नाहीत . परंतु आई किंवा पत्नी घरात एक दिवस नसेल तर घराची दशा कशी होते हे प्रत्येक पुरुषाला माहीत आहेच पण . आईची एक दिवसाची पुरुष एक महिन्यात देखिल पूर्ण करू शकत नाही . वरकरणी नसेना परंतु मनातून स्री चे महत्व त्यांनी केव्हाच मान्य केले आहे . त्रेधा द्वापर . युगापासून आपण स्मरण करीत आलो आहे की पृथ्वीवर जेव्हा एखादे मोठे संकट किंवा आसुर शक्तीचा त्रास व संहार वाढला तेव्हा महिषासुर मर्दिनी, चंडीका अशी अनेक रुपे धारण करून माता पार्वतीने चे मानव जातीला असुरी शक्ती पासून वाचविले आहे .
. ज्या घरात आजही स्त्री चा सन्मान होतो तिथे कशाचीही कमी नाही हे चित्र स्पष्ट पहावयास मिळत आहे ज्या घरात स्री संतुष्ट असते ते घर समाधानी असते . स्री एक काळची पत्नी असली तरी ती अनंत काळची माता असते . घरातील सर्वांना मायेच्या पदरात बांधून ठेवण्याचे महान कार्य स्री करते . म्हणून प्रथम वंदन आईला . लोंकाना देव दिसत नाही . दगडात देव समजणं तस व्यर्थच आहे म्हणून विधीने प्रत्येक घरात आई हे देवाचं रुपडं म्हणून पाठविले आहे . प्रथम तिला वंदन केले की सर्वदेवांना नमस्कार पोहचतो इतकी महत्ती भारतीय संस्कृतीत आईची आहे . आई म्हणजे देवाचं दुसरे रूप आहे .
असे असताना आज मात्र कलियुगात पती परमेश्वर ही भारतीय संस्कृती असताना आपल्या पतीला एकेरी नांवाने हाक मारणे . आरं तुरे बोलणं घरातील सासु सुनेचा छळ महिला कडूनच . स्रीया मधील असूया मोठ्या प्रमाणावर . सार्वजनिक बस ट्रेन लोकल मध्ये एखादी स्री लहान बाळाला कडेवर घेवून उभी राहीली असेल तर पुरुष मंडळी स्त्री दाक्षिण्य म्हणून उभे राहून त्या माऊलीला जागा देतात पण युवती महिला तसे करत नाहीत .
अलीकडे शुभमंगल सोहळ्यात युवतींच्या अपेक्षा इतक्या प्रंचड वाढल्या आहेत - सरकारी नोकरीचा युवक . शेती बंगला प्लॅट पाहीजे छोटे कुंटुंब पाहीजे सासु ननंद नसावी . मुलगा एकटाच असावा . शेती पिकविण्यासाठी नव्हे तर अडचण आली तर विकण्यासाठी ह्या विचाराने शुभमंगलची वये ओलाडून जात आहेत . शेतकरी व्यापारी मुलगा नको नोकरीवालाच पाहीजे . शिक्षण घेवून घरची खूप शेती व्यापार चांगला असून खानदानी स्थिती असूनही आजच्या युवकांना वधु मिळणे कठीण झाले आहे . नोकरी स्वःताचा प्लॅट फक्त दोघे छोटे कुंटुंब अशी अपेक्षा मुलींच्या कडून होत असलेने गुण्यागोविंदाने राहणारी एकत्र कुंटुब पद्धत या युवतीच्या मागणीने संपुष्टात येत असून भग्न कुटुंबे निर्माण होत आहेत
. जर महिला कुटुंबाचा मुख्य कणा मानला जातो तेंव्हा महिला दिनाच्या निमित्ताने या बाबीवर प्रकाश झोत टाकणे काळाची गरज नसावी का ?

नागेश तेली - कसबे डिग्रज.