Sangli Samachar

The Janshakti News

अहमदनगर नव्हे अहिल्यानगर; नामांतरास मंत्रीमंडळाची मान्यतासांगली समाचार - दि. १४ मार्च २०२४
मुंबई - राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन-तीन दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने राज्य मंत्रीमंडळाच्या लागोपाठ बैठकांचे आयोजन करण्यात आले असून यात महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या आठवड्यातील पहिली बैठक सोमवारी झाली. यानंतर आज देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यातील महत्वाचा निर्णय म्हणजे अहमदनरचे नामांतर होय.


गेल्या अनेक महिन्यांपासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती. या अनुषंगाने अहमदनगरचे नाव बदलून आता अहिल्यानंतर असे करण्यात आले आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.