Sangli Samachar

The Janshakti News

दादा घराण्याच्या परंपरागत शत्रूंनी केला गेम, संजय काकांचा हॅट्रिकने खासदारकीवर क्लेमसांगली समाचार - दि.१२ मार्च २०२४
सांगली - सांगलीतील काँग्रेस, विशेषतः दादा घराण्याच्या परंपरागत शत्रूंनी, बरोबर गेम केला असून, विशाल पाटील यांचा पत्ता परस्पर कट केला आहे. त्यामुळे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचा रस्ता मात्र साफ झाला असून ते खासदारकीच्या हॅट्रिकच्या तयारीत लागले आहेत.
मागील 2019 च्या निवडणुकीत दादा घराण्याच्या शत्रूंनी विशाल पाटील यांना स्वाभिमानीतून लढण्यास भाग पाडले. परिणामी त्यांना परंपरागत काँग्रेसची मते मिळू शकली नाही. अशातच वंचित मधून पडळकर यांनी लोकसभेच्या रिंगणात उडी घेतल्याने मत विभागणी झाली. आणि विशाल पाटील यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी हा पराभव विसरून गेली पाच वर्ष चांगली मेहनत केली होती. परंतु आता त्यांच्या बदल्यात ठाकरे गटाकडून पै. चंद्रहार पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात येत आहे.


यामुळे सांगलीच्या काँग्रेसचे, विशेषतः दादा घराण्याचे परंपरागत शत्रू असलेल्यांनी एका दगडात तीन पक्षी मारल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. एक म्हणजे काँग्रेसची हक्काची सीट गेली. दुसरे येथून ठाकरे गटाला पराभव पत्करावा लागणार हे नक्की... आणि तिसरं संजय काकाचा रस्ता मोकळा करून दिला.
आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या जिल्ह्यातील वजनदार नेते, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, आ. विक्रमसिंह सावंत आणि ज्यांच्या नावाचा डंका वाजत होता ते विशाल पाटील. आ. विक्रमसिंह सावंत यांनी नुकताच इशारा दिला होता की, विशाल पाटील पर्यायाने काँग्रेसची सांगलीची जागा डावलली गेली तर आम्ही "जत पॅटर्न" राबवू... आता खरंच ही मंडळी महाआघाडीच्या निर्णयाविरोध जाऊन जत पॅटर्न राबवणार की अन्य काही पर्याय शोधणार ?...