Sangli Samachar

The Janshakti News

जागतिक महिला दिनानिमित्त माजी नगरसेवक विष्णू माने यांच्याकडून महिलांसाठी शेगाव तीर्थयात्रेचे आयोजन


सांगली समाचार - दि. १० मार्च
सांगली - सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक आठ चे माजी नगरसेवक विष्णू माने यांनी जागतिक महिला दिनानिमित्त प्रभागातील महिलांसाठी शेगाव तीर्थयात्रेचे आयोजन केला असून 9 मार्च रोजी दुपारी चार वाजता महिलांची दुसरी बॅच मिरज जंक्शन वरून गोंदिया एक्सप्रेस ने शेगावला रवाना झाली .
यापुढील काळातही माजी नगरसेवक विष्णू माने हे महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील अशी प्रतिक्रिया त्यांचे चिरंजीव गणेश माने यांनी व्यक्त केली .यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शहर जिल्हाध्यक्ष राधिका हारगे यांनीही प्रवासी महिलांना शुभेच्छा दिल्या.


माजी नगरसेवक विष्णू माने यांनी आपल्या प्रभागात मोठे विकास कामे केलेली आहेत प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारे नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना गजानन महाराज दर्शनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विष्णू माने यांचे महिलांकडून कौतुक होत आहे.