Sangli Samachar

The Janshakti News

शिंपी समाजातील पुढच्या पिढीने या व्यवसायात यायला हवे - शशिकांत कोपर्डे



सांगली समाचार - दि. १२ मार्च २०२४
आज इतर समाजातील महिला व पुरुष टेलरिंग व्यवसायात मोठ्या प्रमाणात येत असताना आपल्या पारंपारिक नामदेव शिंपी समाजातील पुढची पिढी या व्यवसायापासून लांब जात असल्याची खंत टेलर्स वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव, शशिकांत कोपर्डे यांनी व्यक्त केली.
येथील नामदेव शिंपी समाज महिला मंडळातर्फे, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घरसंसार सांभाळून शिंपी व्यवसायात मोठी भरारी घेतलेल्या महिलांचा आयोजित केलेल्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कोपर्डे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती स्वाती पिसे यांनी भूषवले होते. तर येथील नामवंत टेलर विजय मुळे तसेच शिंपी समाजातील प्रतिष्ठित पांडुरंग कोपर्डे व किरण कोकणे यांची विशेष उपस्थिती होती.
आपल्या भाषणात बोलताना कोपर्डे पुढे म्हणाले की टेलरिंग व्यवसाय हा आता केवळ कुटुंबापुरता मर्यादित न राहता जागतिक होतो आहे याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, परंतु दुर्दैवाने ती समाजातील पुढची पिढी या व्यवसायात न येता अन्य शिक्षण घेऊन नोकरीकडे वळत आहे. आज शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जात आहे. टेलर वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून ही आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी नामवंत व्यक्तींना पाचरण केले जात आहे. याचा फायदा शिंपी समाजातील सर्वच घटकांनी घेण्याची गरज आहे.


टाइम्स ऑफ लेखाचा हवाला देत कोपर्डे म्हणाले की या व्यवसायातील व्यक्तींना बीपी, शुगर व अन्य आजार होत नाहीत. हे खूप महत्त्वाचे आहे. आज व्यवसायात आधुनिकता आलेली आहे, परराज्यातूनच नव्हे तर परदेशातूनही तेथे ड्रेस डिझाईनिंग साठी लोक येत आहेत. एका ड्रेसची किंमत लाख लाख दीड लाख रुपये आहे. याचा सर्वांनी विचार करावा.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना विजय मुळे यांनी आपले अनुभव कथन करून म्हणाले की, समाजातील ज्या महिलांचा आज सत्कार आहे, त्यांचा अभिमान वाटतो. याचा इतर महिलांनी व पुढील पिढीतील मुला मुलींनी आदर्श घ्यावा. यावेळी किरण कोकणे यांचेही समयोचित मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती मुळे व सौ. सुप्रिया बोंगाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब वेल्हाळ यांनी केले. कार्यक्रमासाठी शिंपी समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुरस्कार प्राप्त महिलांची नावे अशी...
1)सौ निर्मला नंदकुमार पिसे -सांगली
2)सौ सविता संजय काकडे
3)सौ शोभा धनंजय वायचळ 
4)कु. ऋतिका सूर्यकांत कोपर्डे -सांगली 
5)सौ रजनी राजेंद्र मुळे
6)सौ मनीषा संजय पुकाळे
7)सौ प्रिया अजय गुजर-मिरज 
8)सौ प्रेरणा प्रवीण जौजाळ
9)सौ निलीमा ऋषिकेश भस्मे
10)सौ मंजूश्री मुकुंद गुजर-मिरज 
11)सौ ललिता प्रविण गुजर -मिरज