Sangli Samachar

The Janshakti News

जनसुराज्यचा आज मिरजेत युवा संवाद मेळावासांगली समाचार - दि. ११ मार्च २०२४
मिरज - सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जनसुराज्य शक्ती या पक्षाचा युवा व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा सोमवार दि. ११ मार्च रोजी मिरजेत आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात माजी मंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे हे युवकांना पक्षाची भूमिका आणि ध्येयधोरणे याची माहिती देणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी रविवारी पत्रकार बैठकीत सांगितले. 

युवकांना आज रोजगाराची चिंता आहे. मात्र, केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत या योजनेखाली स्वयंरोजगार करू इच्छिणार्‍या युवकांसाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत. बदलती अर्थव्यवस्था याचीही माहिती आजच्या युवकापुढे त्रोटक स्वरूपात मिळते. यामुळे युवकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना राष्ट्र निर्मितीच्या प्रवाहात सहभागी करून घेणे हा मुख्य उद्देश या मेळावा आयोजनामागे असल्याचे श्री. कदम यांनी सांगितले.