Sangli Samachar

The Janshakti News

नागपूर येथील नमो युवा महासंमेलनासाठी मिरजेतून कार्यकर्ते रवानासांगली समाचार - दि. ४ मार्च २०२४
मिरज - नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या नमो युवा महासंमेलनासाठी मिरज विधानसभा मतदार संघातून 250 ते 300 कार्यकर्ते रवाना झाले. यासाठी आयोजित बसेसना, पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी भगवा झेंडा दाखविला.
या महासंमेलनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. तेजस्वी सुर्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. यासाठी देशभरातून हजारो युवक नागपूरकडे रवाना झाले आहेत.यावेळी भाजपचे युवा नेते सुशांत खाडे, भाजपाचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष काकासाहेब धामणे, युवा मोर्चा अध्यक्ष दिगंबर जाधव, पांडुरंग कोरे, माजी नगरसेवक निरंजन आवटी, गजेंद्र कल्लोळी, विक्रम पाटील, धनंजय कुलकर्णी, उमेश हारगे, संदीप कबाडे, राज कबाडे, मोहन वाटवे हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.