Sangli Samachar

The Janshakti News

गूगलकडे आहे 'असा' एक ॲप; विद्यार्थ्यांची गणितं सोडवली जातील मिनिटांतसांगली समाचार - २ मार्च २०२४
मुंबई  - शाळा असो किंवा कॉलेजचे विद्यार्थी असो, त्यांचा गणित हा विषय डोक्यावरून जातो. एकदा ही भावना डोक्यात पक्की झाली की, मग ती दूर करणे कठीण जाते. त्यामुळे विद्यार्थी गणितप्रेमी कसे होतील ही गणिताच्या शिक्षकापुढे नेहमीची समस्या असते. तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण गूगल फोटोमॅथ ॲप वापरकर्त्यांसाठी घेऊन आला आहे. हे एक स्मार्ट कॅमेरा कॅलक्युलेटर आणि गणित सहाय्यक ॲप आहे, जे तुम्हाला फक्त फोटोच्या मदतीने समीकरणे सोडवण्यास मदत करेल. भूमिती असो वा बीजगणित, हे ॲप तुम्हाला स्टेप बाय स्टेप गणितं समजून घेण्यास मदत करेल.गूगलने अधिकृतपणे मार्च २०२३ मध्ये फोटोमॅथ ॲप विकत घेतले होते. पण, याची पहिली घोषणा मे २०२२ मध्ये करण्यात आली होती. या सुरुवातीच्या घोषणेनंतर आणि नियमांच्या मंजुरींचे पालन केल्यानंतर आता हे ॲप जगभरातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. वापरकर्ते फक्त गणिताच्या समीकरणाचा फोटो काढून ते सोडवण्यासाठी स्टेप बाय स्टेप स्पष्टीकरण मिळवू शकतात. या नवीन ॲप इंटिग्रेशनसह गूगल शैक्षणिक पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. गणित विषय शिकणे आणि गणित विषयातील अनेक समस्या सोडवणे सोपे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेत गूगल हा नवीन ॲप वापरकर्त्यांसाठी घेऊन आले आहे.

फोटोमॅथ ॲप कसे वापरावे?

अँड्रॉइड डिव्हाइस असणाऱ्या युजर्सनी प्ले स्टोअर ॲप ओपन करा.
फोटोमॅथ ॲप सर्च करा व तो डाउनलोड करा.
ॲप ओपन करा. त्यानंतर तुम्हाला जे गणित सोडवायचे आहे, तिथे तुमच्या फोनचा कॅमेरा धरा. तुमचे गणित फ्रेममध्ये स्पष्टपणे कॅप्चर झाले आहे ना याची खात्री करून घ्या.
स्कॅनिंग करणे शक्य नसल्यास तुम्ही गणित टाईप करण्यासाठी की-बोर्डदेखील वापरू शकता.
एकदा तुम्ही गणित (समीकरणे) स्कॅन किंवा टाइप केलं, त्यानंतर फोटोमॅथ त्यावर प्रक्रिया करेल आणि काही उपाय सुचवेल.
तुम्हाला गणिताच्या पायऱ्यांनुसार (स्टेप बाय स्टेप) स्पष्टीकरण दिले जाईल.
विशेष म्हणजे फोटोमॅथ हा ॲप बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, सांख्यिकी आणि कॅलक्युलेटरसह गणिताचे विविध विषय हाताळू शकते. वापरकर्त्याच्या अनुभवासाठी इथे अनेक भाषादेखील आहेत. याव्यतिरिक्त समीकरणे सोडवण्यासाठी जाहिरात मुक्त प्रवेशसारख्या अतिरिक्त फीचर्सचा वापर करण्यासाठी वापरकर्ते फोटोमॅथ प्लसचे सदस्यत्व घेऊ शकतात. ॲप वापरण्यासाठी विनामूल्य आहे. पण, अतिरिक्त पाठ्यपुस्तक उपाय, ॲनिमेटेड ट्यूटोरियल आणि मासिक किंवा वार्षिक परीक्षेसाठी सखोल स्पष्टीकरण यांसारख्या अतिरिक्त फीचर्ससह पर्यायी फोटोमॅथ प्लस सबस्क्रीप्शन उपलब्ध आहे. तसेच गूगलच्या इकोसिस्टममध्ये अधिक सुविधा प्रदान करण्याच्या हेतूने फोटोमॅथमधील विशिष्ट फीचर्स कालांतराने गूगल लेन्स आणि गूगल सर्च मध्ये एकत्रित केली जाण्याची शक्यता आहे.