Sangli Samachar

The Janshakti News

सातारा येथे बुलेटचालकांवर कारवाई ! सांगली पोलीस अशी कारवाई करणार का ?



सांगली समाचार - दि. २५ मार्च २०२४
सातारा - येथील मोती चौकात कर्कश आवाजाचे सायलेन्सर असणार्‍या बुलेटचालकांवर सातारा पोलिसांनी कारवाई केली. गत काही दिवसांपासून शहरात कर्कश आवाजाचे सायलेन्सर असणारे बुलेटचालक सुसाट वेगाने बुलेट चालवत होते. त्याचा वृद्ध नागरिक आणि महिला यांना त्रास होत होता. याची गंभीर नोंद घेत सातारा पोलिसांनी अशा बुलेटचालकांवर कायद्याचा बडगा उगारत कारवाई केली.


सांगली शहरातही अशा कर्णकर्कश्य आवाजाच्या दुचाकी घेऊन गल्लीबोळात फिरणारे महाभाग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. याचा वृद्ध नागरिक, महिला व बालकांना त्रास होत असतो. महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये अशाप्रकारे अल्टर केलेल्या सायलेन्सर दुचाकीच्या चालकांवर कारवाई करतात दिसत आहेत मात्र सांगली शहर पोलीस यंत्रणा मात्र अजूनही अशा दुचाकींकडे का दुर्लक्ष करीत आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.