Sangli Samachar

The Janshakti News

वर्तमानपत्रात "मोदी की गॅरंटी" असं वाचायला मिळते, परंतु राज्यात कोण गॅरंटी घेणार ?"

 


सांगली समाचार  दि. १ मार्च २०२४

मुंबई  - पंतप्रधानानी पंधरा लाख रुपये देण्याची गॅरंटी दिली होती. आज कुठल्याही वर्तमानपत्रात मोदी की गॅरंटी वाचायला मिळते. परंतु राज्यात कोण गॅरंटी घेणार आहे. ट्रिपल इंजिनचे सरकार असून, सभागृहात एकही इंजिन दिसत नाही. विधान भवन परिसरात असलेली गर्दी ही कार्यकर्त्यांची नसून, ती कंत्राटदारांची गर्दी आहे, अशा शब्‍दांत आमदार सचिन अहीर यांनी राज्‍य सरकारला टोला लगाविला.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी ठाकरे गटाने महायुती सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. विधान परिषदेत बोलताना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहीर यांनी ट्रीपल इंजिन सरकार असूनही सध्या सभागृहात कुणीच नाही म्हणत मुख्यमंत्री तथा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. 

सचिन अहिर म्हणाले की, अंतरिम अर्थसंकल्प मांडला हा राज्याला दिवाळखोरीकडे घेऊन जाणार आहे. खूप मोठी वित्तीय तूट असून, राज्यावर कोट्यवधी रुपयांचा बोजा पडणार आहे. घोषणा खूप झाल्या पण याची गॅरंटी कोण घेणार आहे. पंतप्रधानानी पंधरा लाख रुपये देण्याची गॅरंटी दिली होती. आज कुठल्याही वर्तमानपत्रात मोदी की गॅरंटी वाचायला मिळते. परंतु राज्यात कोण गॅरंटी घेणार आहे. ट्रिपल इंजिनचे सरकार असून, सभागृहात एकही इंजिन दिसत नाही.

विधान भवन परिसरात असलेली गर्दी ही कार्यकर्त्यांची नसून, ती कंत्राटदारांची गर्दी आहे. देशात शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. नागरिकरण झपाट्याने वाढतेय त्यामुळे शेती भविष्यात टिकणार की नाही असा प्रश्न पडतो. देशात शेतकरी खूश नाही. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. अर्थसंकल्पातून रोजगार निर्मितीची कुठलीच तरतूद नाही. त्यामुळे निव्वळ घोषणा होत आहेत. त्या प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याची टीका त्‍यांनी केली.