Sangli Samachar

The Janshakti News

सातवा वेतन आयोग : 'या' तारखेला होणार महागाई भत्ता वाढीची घोषणा, 50 टक्क्यांवर जाणार DA




सांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
नवी दिल्ली - सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. ही अपडेट आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता संदर्भात. खरेतर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात असतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून असा वर्षातून दोनदा महागाई भत्ता सुधारित केला जात असतो. 

दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीच्या पूर्वीच एक मोठी भेट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. होळीच्यापूर्वीच चार टक्के महागाई भत्ता वाढीची घोषणा केंद्रातील मोदी सरकार करणार असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. सध्या महागाई भत्ता 46% एवढा आहे. हा महागाई भत्ता जुलै 2023 पासून लागू करण्यात आला आहे. मात्र याचा रोखीने लाभ ऑक्टोबर 2023 पासून मिळत आहे. याआधी महागाई भत्ता 42 टक्के एवढा होता. जुलै 2023 पासून आता 46 टक्के या दराने डीए मिळत आहे. विशेष म्हणजे आता यामध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ होणार आहे. आत्तापर्यंतचा ट्रेंड पाहता महागाई भत्त्यात चार टक्के वाढ होणे हे जवळपास सुनिश्चित झाले आहे. आता फक्त याची औपचारिक घोषणा बाकी आहे. तसेच ही घोषणा या चालू महिन्यातच होणार असा अंदाज आहे.


कोणत्या तारखेला होणार महागाई भत्ता वाढीची घोषणा

कित्येकदा सरकारने मार्च महिन्यात जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ लागू केली आहे. यामुळे यावर्षी देखील होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यातच महागाई भत्ता वाढीचा निर्णय होऊ शकतो असा दावा होत आहे. यंदा 20 मार्चपर्यंत महागाई भत्ता वाढीची घोषणा होऊ शकते.  याबाबत केंद्राकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र मीडिया रिपोर्टमध्ये असे भाकीत वर्तवले जात आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर 20 मार्च 2024 ला केंद्रीय कॅबिनेटची एक बैठक होईल आणि या बैठकीतच महागाई भत्ता वाढीवर शिक्कामोर्तब केला जाईल असे म्हटले जात आहे. होळीच्यापूर्वी 20 मार्चला कॅबिनेटची बैठक होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये याबाबतचा सकारात्मक निर्णय होईल अशी आशा यावेळी व्यक्त होत आहे. असे झाल्यास 48.67 कार्यरत कर्मचाऱ्यांचा आणि 67.95 पेन्शनभोगी लोकांचा होळीचा सण गोड होणार आहे. अर्थातच या निर्णयाचा एक कोटी कर्मचारी आणि निवृत्त वेतनभोगी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे.

महागाई भत्ता कितीवर जाणार

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये आणखी चार टक्के वाढ होणार आहे. अर्थात हा भत्ता 50 टक्क्यांवर जाणार आहे. याबाबतचा निर्णय 20 मार्चला कॅबिनेटची बैठक घेऊन घेतला जाऊ शकतो असा अंदाज आहे. केंद्रातील मोदी सरकारने याबाबत कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही मात्र मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा होत आहे.

दोन महिन्याची महागाई भत्ता थकबाकी देखील मिळणार

विशेष म्हणजे याबाबतचा निर्णय जर या महिन्यात घेतला गेला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांची अर्थातच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची महागाई भत्ता थकबाकी देखील दिली जाणार आहे. याचा रोखीने लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत अर्थातच जे वेतन एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या वेतनासोबत मिळणार आहे. यामुळे आता केंद्र शासनाकडून 20 तारखेला खरंच याबाबत सकारात्मक निर्णय होणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.