Sangli Samachar

The Janshakti News

शिंदे-पवार सोबत तरीही भाजपचं मिशन 45 धोक्यात! मविआचं काय?



सांगली समाचार - दि. १३ मार्च २०२४
मुंबई  - महाराष्ट्रातील 48 पैकी 45 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या, असा निर्धार भाजप प्रणित महायुतीने केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडत भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतले. पण, त्यांचा फायदा होताना दिसत नाहीये. दुसरीकडे महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी कशी राहू शकते, याबद्दलचा नवा ओपिनियन पोल समोर आला आहे. त्यामुळे महायुतीच नाही, तर महाविकास आघाडीचे टेन्शन times now-etg survey 2024 च्या ओपिनियन पोलने वाढवलं आहे. एनडीए लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जागा जिंकेल, असा दावा भाजपकडून केला जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट महायुतीने ठेवले आहे. पण, ते साध्य होण्याची शक्यता कमी दिसत आहे. इंडिया टुडे-सी व्होटर, इंडिया टीव्ही सीएनएक्स या दोन ओपिनियन पोलनंतर आता टाईम्स नाऊ ईटीजीच्या सर्वेमधूनही असाच कौल आला आहे. 


महाविकास आघाडी विरुद्ध महायुती... महाराष्ट्रात कुणाला किती जागा?

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशाची नजर महाराष्ट्राकडे आहे. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. त्याचबरोबर कोणत्याही महत्त्वाच्या निवडणूका न झाल्याने मतांचे समीकरणांचा अंदाज लावणे अवघड झाले आहे. अशात समोर आलेले ओपिनियन पोल महायुतीचे टेन्शन वाढवताना दिसत आहे. 

टाईम्स नाऊ ईटीजीच्या ओपिनियन पोलनुसार, जर देशात आजघडीला लोकसभा निवडणुका झाल्या, तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा महायुतीला मिळतील असा अंदाज मांडला आहे. सर्वेनुसार महायुती 48 पैकी 34 ते 38 जागा जिंकेल, असा अंदाज आहे. दुसरीकडे विरोधकांची महाविकास आघाडी 9 ते 13 जागा जिंकू शकते, असे हा ओपिनियन पोल सांगतो. तर 0 ते 1 जागा अपक्षाला मिळू शकते.  आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला, तर महायुतीला या निवडणुकीत फटका बसताना दिसत आहे. मागच्या निवडणुकीत युतीने 41 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने फक्त 5 जागा जिंकल्या होत्या. इतर जागांवर अपक्ष निवडून आले होते. 

पाच वर्षात महाराष्ट्रात दोन राजकीय भूकंप

मागील लोकसभा निवडणुकीवेळची राजकीय परिस्थिती आणि आताची स्थिती पूर्णपणे बदलून गेली आहे. भाजपच्या केंद्रातील सरकारला दहा वर्षे झाली आहे. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे. त्यामुळे भाजपसोबत गेलेल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाची मतेही गेली का? हे या निवडणुकीत दिसणार आहे.

India TV-CNX Opinion Poll चे महाराष्ट्रातील आकडे समोर आले आहेत. भाजप 25, शिवसेना 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 अशा एकूण 35 जागाचं महायुतीला जिंकता येईल, असा या पोलचा अंदाज आहे. 2019 मध्ये भाजप-शिवसेना युतीला 41 जागा मिळाल्या होत्या. त्याच्याशी तुलना केली असता महाराष्ट्रात युतीला 6 जागांचा फटका बसताना दिसत आहे.