Sangli Samachar

The Janshakti News

लग्नाच्या 37 वर्षानंतर अभिनेता गोविंदाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठसांगली समाचार - दि. २२ मार्च २०२४
मुंबई - बॉलिवूड अभिनेता गोविंदाने सुनिता अहूजासोबत लग्नगाठ बांधली होती. त्याने त्याचं लग्न बऱ्याच काळापासून सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. अशातच लोकं नेहमीच त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. लग्नाच्या अनेक वर्षानंतर गोविंदाने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. मात्र तुम्हाला गोंधळात पडायची काहीच गरज नाही. कारण अभिनेत्याने जरी पुन्हा एकदा लग्न केलं असलं तरिही त्याने त्याच्या पत्नीसोबतच पुन्हा एकदा लग्न केलं आहे. त्यामुळे हे सिद्ध झालं आहे की, त्यांच्या प्रेमळ नात्यात आजही तो गोडवा आहे. 'डान्स दीवाने 4'च्या मंचावर गोविंदाने पत्नी सुनीतासोबत पुन्हा एकदा वरमाला सेरेमनी केली.

हे तेव्हा झालं जेव्हा गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा फेमस रियलिटी शो 'डान्स दीवाने सीझन 4'च्या सेटवर पोहचले होते. जजच्या खुर्चीत बसलेली माधुरी दीक्षितने डान्सर आणि एक्टर गोविंदासोबत तिचं गुपचूप लग्नाबाबत विचारलं. माधुरी ने पुढे विचारलं, 'गोविंदा जी, तुमचं लग्न कधी आणि केव्हा झालं? काही समजलंच नाही' यावर सुनिता म्हणाली, 'आमच्या लग्नाचा एकही फोटो नाही' यानंतर संधी न दवडता माधुरीने लगेजच या संवादात उडी घेतली आणि म्हणाली, 'फोटो नसेल तर काय झालं, डान्स दीवाने हा वेड्यांचा परिवार आहे, आज आम्ही तुमचं पुन्हा लग्न लावू.'


गोविंदा आणि सुनीताचं पुन्हा झालं लग्न

यानंतर आपण गोविंदा आणि सुनिताचा लग्नसोहळा पाहू शकतो. ज्यामध्ये गोविंदा सुनिताला तिच्या गळ्यात हार घालताना दिसत आहे. दोघांनीही मॅचिंग कपडे यावेळी परिधान केले होते. दोघांनी गुलाबी रंगाचे कपडे यावेळी घातले होते. दोघंही एकमेकांसोबत खूप खूष दिसत आहेत. वरमाला घातल्यानंतर दोघंही नाचताना दिसले इतकंच नाही तर शेवटी त्यांनी एकमेकांना मिठीही मारली. सोबतच दोघंही खूप एक्साइटेडही दिसत होते.

भांडता-भांडता प्रेमात पडले
याआधी सिमी ग्रेवालसोबत एका जुन्हा मुलाखतीदरम्यान गोविंदाने सांगितलं की, कसा तो त्याच्या पत्नीच्या प्रेमात पडला होता. अभिनेत्याने सांगितलं की, गोविंदा आणि सुनिता परिवाराच्या निमीत्ताने पहिल्यांदा भेटले होते. गोविंदाचे काका आणि सुनीताच्या बहिणीचं एकमेकांशी लग्न झालं होतं. यावेळी तिथे सुनीताही आली होती. सुनिताने सांगितलं की, गोविंदासोबत तिचं नातं मतभेदाचं होतं. सुरुवातीला या दोघांमध्ये खूप भांडणं व्हायची. पण एकदा चुकून त्यांचा हात एकमेकांना लागला तेव्हा दोघांनाही काहीतरी वेगळं वाटलं, असंही गोविंदाने मुलाखतीत सांगितलं, पुढे अभिनेता सांगितलं की, ते कसे एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र अनेकदा ते एकमेकांशी भांडत रहायचे.