Sangli Samachar

The Janshakti News

घड्याळाशिवाय दुसरे चिन्ह द्या! शरद पवार यांची सुप्रिम कोर्टाला विनंतीसांगली समाचार - दि. १३ मार्च २०२४
मुंबई - दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना घडयाळाशिवाय दुसरे चिन्ह वापरण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. शरद पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. निवडणुकीत मतदान होईल तेव्हा घडयाळ हे चिन्ह शरद पवार यांच्याच राष्ट्रवादीचे आहे असे समजून लोक मतदान करतील. त्यामुळे हे चिन्ह कुणालाही देऊ नये असे ते म्हणाले. दरम्यान, याचिकेवर पुढील सुनावणी गुरुवारी 14 मार्चला होणार आहे.