Sangli Samachar

The Janshakti News

सापाच्या विषावर उपचार करण्यासाठी वैज्ञानिकांनी शोधला सोपा उपाय?

 


सांगली समाचार  - दि. २२८|०२|२०२४

मुंबई  - आपल्या देशात सर्पदंशामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी अनेक लोक सर्पदंशामुळे जीव गमावतात. पण आता वैज्ञानिकांनी त्यावर उपाय शोधला आहे, जो सापाच्या विषाचा प्रभाव नष्ट करून लोकांचा जीव वाचवू शकेल. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स (IISC), बेंगळुरू येथील शास्त्रज्ञांनी एक अशी सिंथेटिक ह्युमन अँटिबॉडी विकसित केली आहे, ज्याचा वापर करून कोब्रा, किंग कोब्रा, क्रेट आणि ब्लॅक माम्बा यांसारख्या अत्यंत विषारी सापांचं विष निष्प्रभावी केलं जाऊ शकतं. आयआयएससी बेंगळुरूच्या या टीमने सांगितलं की नवीन विष-निष्क्रिय अँटिबॉडी हे एचआयव्ही आणि कोविड-19 विरुद्ध अँटिबॉडीज तपासण्यासाठी पूर्वी वापरल्या गेलेल्या दृष्टिकोनाचा अवलंब करून निर्माण केलं गेलं आहे. सापाचं विष निष्क्रिय करण्यासाठी अँटिबॉडीज विकसित करण्याची ही पहिलीच रणनीती स्वीकारली गेली आहे आणि त्यावर काम केलं गेलं आहे.

वैज्ञानिक काय म्हणतात

स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्युट आणि इव्होल्युशनरी व्हेनॉमिक्स लॅबमधील (EVL) पीएचडीचे विद्यार्थी आणि पब्लिकेशनचे को फर्स्ट ऑथर सेनजी लॅक्मे आर. आर. आर. यांनी सायन्स ट्रान्सलेशन मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या रिसर्चबाबत माहिती दिली. अशाप्रकारे आम्ही सार्वत्रिक अँटिबॉडी सोल्युशनच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे आणि हे लोकांना सापाच्या विषापासून वाचवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरेल, असं ते म्हणाले. दरवर्षी हजारो लोक आणि प्राणी सर्पदंशामुळे मरतात, खासकरून भारत आणि आफ्रिकेत. आत्तापर्यंत घोडे, पोनी आणि खेचर यांना हळूहळू सापाच्या विषाचे इंजेक्शन दिले जाते आणि जेव्हा त्यांच्या रक्तातील अँटिबॉडीज सक्षम होतात, तेव्हा त्या सापाच्या विषाविरूद्ध वापरल्या जातात.

अनेक आव्हानं

सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेसचे असोसिएट प्रोफेसर आणि अभ्यासाचे संयुक्त लेखक कार्तिक सुंगर म्हणाले की, खरं तर हे प्राणी त्यांच्या आयुष्यात अनेक बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या संपर्कात येतात, ज्यामुळे त्यांच्यात अँटि व्हेनमसह मायक्रोऑरगॅनिझमविरुद्ध अँटिबॉडी तयार होतात, ज्या उपचाराच्या दृष्टीने निरुपयोगी आहे. अशाप्रकारे, अँटिव्हेनमच्या एका बाटलीतील सापाच्या विषाला टार्गेट करणाऱ्या अँटिबॉडी 10% पेक्षा कमी तयार होऊ शकतात. अशाप्रकारे, अनेक प्रकारच्या स्क्रिनिंगनंतर, शेवटी या अँटिबॉडीचा निर्णय घेण्यात आला, जो 3FTx च्या 149 पैकी 99 व्हेरियंटमध्ये बाइंड होऊ शकेल.