Sangli Samachar

The Janshakti News

🙏असे संत पुन्हा होणे नाही.. 🙏


दिगंबर जैन मुनि परंपरा हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. ही मुनि परंपरा पुन्हा एकदा पूर्णस्थापित करण्याचे कार्य परमपूज्य प्रथमचार्य १०८ श्री शांतिसागरजी महाराज यांनी केले. त्यामुळे १९२० पासून आपल्या संपूर्ण देशामध्ये हजारो त्यागी आपणास पुन्हा एकदा दिसू लागले..

अलिकडच्या काळामध्ये अनेक त्यागींची ही परंपरा सुरू असताना, याच मालिकेमध्ये एक अत्यंत कठोर तपश्चरण करणारे, जिनवाणीचा अत्यंत सखोल अभ्यास असणारे, शेकडो श्रावकांना दिगंबर मुनि दीक्षा देऊन त्यांच्या जीवनाचे अनमोल परिवर्तन करणाऱ्या, त्याचप्रमाणे लाखो श्रावक - श्राविकांना सतत आपल्या अनमोल हितोपदेशाच्या माध्यमातून त्यांना धर्म मार्गावर पुन्हा एकदा प्रस्थापित करणाऱ्या, अत्यंत ज्ञानी, घोर तपस्वी, संतश्रेष्ठ प.पू.१०८ आ श्री विद्यासागर जी महाराज यांच्या भव्यात्म्याला भावपूर्ण विनयांजली..

असे श्रेष्ठ संत, गुरूवर्य पुन्हा होणे नाही..


संपादक मंडळ

जैन विचार धारा

ई-मासिक, सांगली.

🌷🙏🙏🙏🌷