Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत "मी मराठी - माझी भाषा मराठी - माझी स्वाक्षरी मराठी" उपक्रम


सांगली समाचार  - दि. २७|०२|२०२४

सांगली - मराठी भाषा दिनानिमित्त "मी मराठी माझी भाषा मराठी माझी स्वाक्षरी मराठी" हा उपक्रम मनसेच्या वतीने स्टेशनं चौक सांगली येथे साजरा करण्यात आला

ह्या कार्यक्रमाचे उदघाटन दैनिक सकाळचे सहसंपादक  शेखर जोशी व महिला जिल्हा अध्यक्ष मनसे सरोज लोहगावे यांच्या हस्ते श्रीफळं वाढवून करण्यात आले. मराठीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी मनसे नेहमीच आग्रही राहिली आहे. यापुढेही राहील तसेच आयुक्तानी मराठी पाट्या संदर्भात ठराव केला आहे, दहा हजार इतका दंड ही आकारला आहे. मात्र अजून एक ही कारवाई का केली नाही ? अजूनही इंग्रजी कानडी बोर्ड दिसत आहेत. ते मराठीत होण्यासाठी मनसेला रस्त्यावर उतरावे लागेल, असे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष तानाजीराव सावंत यांनी केले.

यावेळी उपस्थित संदिप टेंगले, दयानंद मलपे, सरोज लोहगावे महिला जिल्हा अध्यक्ष, जमीर सनदी, विठ्ठल शिंगाडे, अमित पाटील, हरी पाटणकर, रोहीत घुबडे पाटील,अमर औरादे, विकी गोसावी असे असंख्य मनसैनिक उपस्थित होते.