Sangli Samachar

The Janshakti News

पटेलांची उमेदवारी म्हणजे पार्थला मागून दाराने एन्ट्री ?

 


सांगली समाचार  - दि. १७|०२|२०२४

मुंबई  - राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेलांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा अर्ज भरला आहे. पण अद्याप टर्म संपलेली नसतानाच त्यांनी राजीनामा देत पुन्हा नव्या जागेसाठी अर्ज दाखल केला आहे. पटेल यांनी असा निर्णय का घेतला? यावर त्यांनी माध्यमांशी बोलताना नुकतंच भाष्य केलं. पण काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्या असंही सांगितलं, त्यामुळं यामागं नेमकी काय कारणं असू शकतील याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मागून दाराने राज्यसभेत पाठवण्याची खेळी असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.अर्थात याचा निर्णय पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यावेळेस  राजकारणाचे वारे नि वादळ कसे वाहते, यावरच अवलंबून असल्याचं राजकीय विश्लेषणाची मत आहे. तोपर्यंत हे सारे ठोकताळे आहेत. पार्थ पवार यांना राजकारणातील आपले वारसदार म्हणून पुढे आणण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. मागील निवडणुकीत ही इच्छा फलद्रूप झालेले नव्हती. आता मागील दराने पार्थला राज्यसभेत पाठवून ही इच्छा पूर्ण करण्याचा अजितदादांचा मनसुबा आहे. यातही कितपत यश येते हे आगामी काळच याचे उत्तर देऊ शकतो