Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतून दिल्लीत कोण जाणार ?




सांगली समाचार | बुधवार दि. ०७ | ०२ | २०२४

लोकसभा निवडणूक 2024 (Loksbha Election 2024) तोंडावर आली आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारसंघनिहाय मोर्चेबांधणी केली जात आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

Loksabha Constituency) कोण लढविणार याबाबत जोरदार रस्सीखेच पाहाला मिळते आहे. वास्तविक पाहता सांगली हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस (Congress) नेते दिवंगत वसंतदादा पाटील आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी प्रदीर्घ काळ या मतदारसंघतून प्रतिनिधित्व केले. मात्र, सध्या या मतदारसंघातील समिकरणे पूर्ण बदलली आहेत. त्यामुळे उमेदवार निवडीपासून ते थेट जागा कोण लढवणार इथपर्यंत चर्चांना उधान आले आहे.

संजय काका पाटील यांची हॅटट्रीक की पत्ता कट?

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी, लोकसभा निवडणूक 2014 मध्ये असलेली काँग्रेस विरोधी लाट आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक 2019 मध्येही काँग्रेस आणि विरोधकांनी खाल्लेली कच याची परिणीती भारतीय जनता पक्षाचे संजय काका पाटील निवडून येण्यात झाली. पाठिमागील दोन टर्म संजय काका पाटील या मतदारसंघात खासदार म्हणून लोकसभेवर प्रतिनिधीत्व करत आहेत. दरम्यान, या वेळी त्यांच्या विरोधात केवळ विरोधकच नव्हे तर स्वपक्षातूनही जोरदार विरोध आहे. त्यामुळे या वेळी संजय काका पाटील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात हॅटट्रीक करणार की तत्पूर्वीत तिकीट कापून पक्ष (भाजप) त्यांचा पत्ता कट करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

पाटलांचा त्रिकोण

सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी एकाच वेळी तीन पाटील सध्या तरी इच्छुक असल्याचे दिसते. यात पहिल्या क्रमांकावर आहेत विद्यमान खासदार संजय काका पाटील (भाजप), दुसऱ्या क्रमांकावर आहेत विशाल पाटील. जे पाठिमागच्या वेळी चक्क स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) तिकीटावर लढले होते. तिसरे आहेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील. यापैकी संजय पाटील यांना पक्ष तिकीट देणार का याबाबत अद्याप निश्चिती नाही. विशाल पाटील यांच्याबाबत बोलायचे तर मुळात सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकासआघाडीच्या जागावाटपात काँग्रेस लढणार का? ही जागा काँग्रेसने लढल्यास विशाल पाटील यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. चंद्रहार पाटील यांनी बैलगाडा आणि कुस्त्यांचा आखाडा याच्या माध्यमातून तयारी केल आहे. मात्र, ते कोणाकडून लढणार याबाबत अद्याप तरी कोणतीही निश्चिती नाही. मात्र, चंद्रहार पाटील निवडणूक लढवत असल्यास वंचित बहुजन आघाडीचा त्यांना पाठिंबा असेल असा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आगोदरच शब्द दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पाटलांचा हा त्रिकोण आगामी निवडणुकीपर्यंत कसा आकार घेतो यााबत उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणूक 2019 मतदान (पहिले तीन उमेदवार)

संजयकाका पाटील, भाजप- 5 लाख 8,995
विशाल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना- 3 लाख 44,643
गोपीचंद पडळकर, बहुजन वंचित आघाडी- 3 लाख 234
राजकीय स्थिती

सांगली जिल्ह्यातील लोकसभेच्या दृष्टीने राजकीय स्थिती पाहिली तर, वातावरण संमिश्र आहे. लोकसभा मतदारसंघात जत, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी, पलूस-कडेगाव, मिरज आणि सांगली हे विधानसभा मतदारसंघ येतात. याबैकी काही ठिकाणी भाजप आणि काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. त्यातच खानापूर आटपाडी मतदारसंघातून अनिल बाबर यांचे अचानक निधन झाले. त्यामुळे या ठिकाणी महायुतीला मोठा धक्का बसला आहे. बाबर हे एकनाथ शिंदे गटाचे आमदार होते. मुख्यमंत्री शिंदे यांचे ते खंदे समर्थक मानले जात. त्यांना मानणारा वर्ग खानापूर आणि आटपाडी अशा दोन्ही तालुक्यांमध्ये आहे. मात्र, त्यांच्या निधनामुळे हा मतदार कोणती भूमिका घेतो याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मागच्या वेळी वंचितकडून लढणारे गोपिचंद पडळकर सध्या भाजपचे विधानपरिषदेतील आमदार आहेत. अशा वेळी उमेदवार कोणताही असला तरी त्याला युती आणि आघाडीची गरज भासणार आहे. जो कोणी हा मतदारसंघ ताकदीने लढवेल, लोकांचे प्रश्न घेऊन लोकांसमोर जाईल तोच जिंकेल जनतेचे मन, अशी स्थिती आहे.