Sangli Samachar

The Janshakti News

भावनिक आव्हानाला बळी पडू नका असे म्हणणाऱे अजितदादा स्वतःसच भावनिक

सांगली समाचार  - दि. १७|०२|२०२४

बारामती - गेल्याच आठवड्यात विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी, शरद पवार यांचे नाव न घेता बारामती मधील मतदारांना भावनिक आवाहन केले जाईल, अन्यही काहीबाही बोलले जाईल,त्याला बळी पडू नका असे म्हटले होते. मात्र आज बारामती मतदारसंघातील बूथ कार्यकर्त्यांसमोर बोलताना स्वतः अजितदादाच भावनिक झाल्याचे व त्यांच्या डोळ्यात अश्रू तरंगल्याचे उपस्थित त्यांना पहावयास मिळाले.

लोकसभा मतदारसंघात माझा परिवार सोडला तर कदाचित माझ्यासोबत कुटुंबातील कोणीही नसेल माझ्या उमेदवाराच्या विरोधात ते प्रचार करताना दिसतील. मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे'. अजितदादा यावेळी बोलताना म्हणाले, पक्ष चोरल्याचा आरोप केला जात आहे. मात्र मी कालही राष्ट्रवादीत आजही राष्ट्रवादीत आणि उद्याही राष्ट्रवादीतच आहे. चौकशी लागली म्हणूनच तिकडे गेले असे आरोप देखील केले जात आहेत. त्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. अजूनही काही लोकांना असं वाटतंय की हे एकच आहेत आपल्याला बनवतात पण तशी परिस्थिती आता राहिलेली नाही.

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार हाच उमेदवार आहे असे समजून मी दिलेल्या उमेदवाराला निवडून द्या. खासदारकीला डाग लागला तर राज्यात आणि देशात माझी किंमत कमी होईल. ज्या विचारांचे केंद्रात सरकार आहे त्याच विचारांचा खासदार बारामतीतून निवडून गेला तर मोठे प्रमाणावर विकास होईल असेही अजित पवार यावेळी म्हणाले. सध्या बारामती सह संपूर्ण राज्यात हाच चर्चेचा सूर पहावयास मिळाला.