Sangli Samachar

The Janshakti News

अजितदांनी म्हटलं "तू चंद्रावर जा"... कुणाला व का ?

 सांगली समाचार - दि. १६|०२|२०२४

बारामती - अजित पवार हे आपल्या बेधडक वक्तव्याने नेहमीच प्रसिद्धीच्या स्वतःच असतात त्यामुळे ते कधी कधी वादग्रस्त हे ठरतं असाच एक प्रसंग नुकताच बारामती येथे घडला.

सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असलो तरी पुढील सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्ते आणि आमदारांची भावना आहे. अनेक जाहीर कार्यक्रमांमध्ये नेत्यांकडून ही भावना बोलून दाखवली जात आहे. अजित पवारांना या उत्साही नेते आणि कार्यकर्त्यांना जरा धीर धरा असा सल्ला काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत दिला होता. पण त्यानंतरही कार्यकर्ते मात्र काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. आज तर बारामतीत थेट अजित पवारांसमोर एका कार्यकर्त्याने तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशी मागणी केली. त्यावर अजित पवारांनीही भन्नाट उत्तर दिलं. अजित पवार बारामतीत असून यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. भाषण सुरु असतानाच एक कार्यकर्ता 'दादा तुम्ही मुख्यमंत्री व्हा' असं ओरडला. त्यावर अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भन्नाट 'तू चंद्रावर जा आणि मला मुख्यमंत्री व्हायला सांग' असं उत्तर दिलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

त्यानंतर या हास्यात आपणही सहभागी होत, अजितपवार म्हणाले, "मुख्यमंत्रीपदासाठी मी हापापलेलो नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत काम झालं पाहिजे अशी भूमिका आहे. लोकशाहीत बहुसंख्येला महत्व असतं. काँगेसबरोबर सरकार आल तेव्हा मुख्यमंत्री आरआरपाटील किंवा छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते. विरोधी पक्ष नेता म्हणून फक्त भांडण करता येतात विकास करता येत नाही," अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली.