Sangli Samachar

The Janshakti News

मराठवाड्यातील तीन जिल्हयात इंटरनेट सेवा बंद.जरांगे पाटील यांचे तीन साथीदार पोलिसांच्या ताब्यात

 


सांगली समाचार  - दि. २६|०२|२०२४

जालना - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तूळात खळबळ निर्माण झाली आहे. माझ्यावर सलाईनमधून विष प्रयोग करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत त्यांनी हा कावा आता चालणार नाही असे सांगितले. त्यामुळे या आरोपावरुन जोरदार प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहे. यावेळी त्यांनी मला संपवायचे असेल तर मीच सागर बंगल्यावर येतो. मला मारून टाका असे आव्हानही फडणवीस यांना दिले. त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यानंतर राज्य सरकारनं अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केल्यानंतर जरांगे पुन्हा अंतरावली सरावटीत दाखल झाले. त्यानंतर राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्हयात इंटरनेट सेवा बंद केली.

जरांगे हे अंतरावली सराटी पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या भांबेरी गावात रात्री मुक्कामाला होते. आज सकाळी जरांगे यांचे तीन समर्थक शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि श्रीराम कुरणकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा निर्धार केल्यानंतर हे तिघेही मुंबईला जाण्याच्या तयारीला लागली होते. त्यामुळे त्यांना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी तिघांना ताब्यात घेतले.

काल घडल्या या घडामोडी

काल मुंबईला जाण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केल्यानंतर मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे या आरोपांमुळे भाजपचे नेते सुध्दा संताप व्यक्त केला. भाजप नेत्यांनी सागर बंगल्यावर जाण्यासाठी आधी आमची भिंत पार करावी लागेल असा इशारा दिला आहे. तर आमदार नितेश राणे यांनीही जरांगे पाटील यांना आव्हान दिलंय. आंदोलन नेमकं कशासाठी आहे? मराठा समाजासाठी आहे की फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी आहे? असा प्रश्न उपस्थिती केला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही जरांगे पाटील आता हे दुकान बंद करा असे म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा जातीवाचक  उल्लेख केल्यामुळे पुण्यातील हिंदू महासभाही आक्रमक झाली आहे. हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी जरांगे विकृत होत चालले आहेत अशी टीका केली आहे. तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेडने आरक्षण द्यायचंच नाही हा कावा आज मनोज जरांगेंच्या माध्यमातून महाराष्ट्रात समोर जाहीर झाल्याचे म्हटले आहे.